Breaking News
virajas mrinal kulkarni family
virajas mrinal kulkarni family
Home / जरा हटके / मृणाल कुलकर्णी यांना विराजससाठी हवी अशी बायको…

मृणाल कुलकर्णी यांना विराजससाठी हवी अशी बायको…

‘माझा होशील ना’ मालिकेतील आदित्य हा प्रसिद्ध अभिनेत्री, दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. या दोघांनी एकत्रितपणे ‘रमा माधव’ चित्रपटाची धुरा सांभाळली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन मृणाल कुलकर्णी यांनी केले होते तर विराजसने या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका बजावली होती. मृणाल कुलकर्णी यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या सुनेबद्दलच्या अपेक्षा मीडियाशी बोलून दाखवल्या आहेत, या ऑनलाइन मुलाखतीत विराजस देखील सहभागी झालेला दिसून आला.

सुरुवातीला गमतीगमतीत मृणाल कुलकर्णी म्हणतात की “माझ्या सुनेने तांदूळ निवडून दाखवावेत…ती नीट बोलते की नाही यासाठी तिने गाऊन दाखवावे…तिने चालून दाखवावे….या अपेक्षा व्यक्त केल्यानंतर मृणाल कुलकर्णी अचानकपणे मनसोक्त हसून लागल्या आणि पुन्हा एकदा म्हणाल्या की ….”

“माझ्या सूनेबद्दल काहीही अपेक्षा नाहीत… विराजसला पूरक अशी, त्याला हवी तशी मैत्रिण त्याला मिळावी आणि ही मैत्रिण आमच्या घरात सून म्हणून यावी, अशी आमची माफक अपेक्षा आहे….आयुष्य त्याचे आहे आणि मुलगी निवडण्याचा अधिकारही सर्वस्वी त्याचा आहे. तो जो काही निर्णय घेईल, त्यात आम्ही आनंदी असू.” माझा होशील ना ही विराजसने अभिनित केलेली पहिलीच मालिका आहे. याअगोदर त्याने कॉलेजमध्ये असताना अनेक नाटकांतून विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. थेटरऑन एंटरटेनमेंट या रंगभूमी ग्रूप अंतर्गत त्याने अनेक नाटकांचे लेखन, दिग्दर्शन केले असून अभिनय देखील साकारला आहे. माधुरी आणि हॉस्टेल डेज या चित्रपटातही त्याने प्रेक्षकांच्या अपेक्षांना साजेसा अभिनय केला आहे.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.