Breaking News
apurva nemlekar chavlichi sheng
apurva nemlekar chavlichi sheng
Home / जरा हटके / ‘चवळीची शेंग’ ही नटीची व्याख्या बदलणारी अभिनेत्री…

‘चवळीची शेंग’ ही नटीची व्याख्या बदलणारी अभिनेत्री…

झी मराठी वरील रात्रीस खेळ चाले मालिकेच्या तिन्ही पर्वात शेवंताचे पात्र कायम राहिले. याच भूमिकेने अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरला अमाप प्रसिद्धी आणि यश मिळवून दिले. खरं तर पहिल्या पर्वात शेवंता होती मात्र ती कशी होती याबाबत गुप्तता बाळगण्यात आली होती तर मालिकेच्या दुसऱ्या पर्वात शेवंता आणि अण्णा नाईक यांचीच चर्चा सगळीकडे पाहायला मिळाली. नुकतेच मालिकेचे तिसरे पर्व देखील सुरू झाले मात्र यातून शेवंता आता कावेरीच्या रूपातून पाहायला मिळत आहे. दुसऱ्या पर्वात शेवंताचा अंत झाला मात्र आता तिसऱ्या पर्वात तिला काय करायला मिळणार याबाबत अधिक उत्सुकता दिसून आली. शेवंताच्या भूमिकेसाठी अपूर्वाला एक खास गोष्ट करावी लागली होती हे कित्येकांना माहीत नसेल.

अपूर्वाने शेवंताच्या भूमिकेसाठी तब्बल १२ किलो वजन वाढवले होते याबाबत ती म्हणते की , ‘मी अगोदर खूपच बारीक होते हे सांगूनही कोणाला पटणार नाही जेव्हा शेवंता ची भूमिका माझ्याकडे आली त्यावेळी मला माझे वजन वाढवावे लागले शिवाय केसांची एक कुरुळी बट आणि त्यावर चढवलेला तांबूस रंग ही शेवंताची ओळख बनून गेली. चवळीची शेंग असणारी नायिका छोट्या पडद्यावरील शेवंताच्या भूमिकेपुढे सफसेल फेल ठरली. लोकांनी या भूमिकेला खूप उचलून घेतले मी अगदी रेल्वेस्टेशनवर जरी दिसले की तरुण मुलं शेवंताss…शेवंताss ओरडू लागली , खरं तर त्यांच्या या कृतीमुळे मी खूपच घाबरून जायचे पण हीच आपल्या अभिनयाची खरी पावती बनून गेली. लहानांपासून ते वयोवृद्धांना मी जिथे दिसेल तिथे शेवंता अशीच हाक मारू लागले’.

apurva photo shoot
apurva photo shoot

सध्या सुरक्षेच्या कारणास्तव सर्वच मालिकांचे चित्रीकरण थांबले आहे. नुकत्याच सुरू झालेल्या रात्रीस खेळ चाले ३ मालिकेतून बऱ्याच नव्या कलाकारांना संधी मिळत आहे. मालिकेचे कथानक हळूहळू उलगडत असतानाच मालिकेने ब्रेक घेतला त्यामुळे वातावरण सुरळीत होईस्तोवर तरी मालिकेत पुढे काय काय घडणार याची उत्कंठा प्रेक्षकांना कायम लागून राहील हे नक्की…

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.