मृणाल कुलकर्णी यांचा लेक म्हणजेच विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांचा काही महिन्यांपूर्वी गुपचूप साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर त्यांनी ही बातमी काही दिवसांनी सोशल मीडियावर जाहीर केली होती. साखरपूड्यानंतर हे दोघे लग्न कधी करणार याकडे लक्ष्य लागून राहिले असतानाच त्यांच्या लग्नाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओत विराजस आणि शिवानी मुंडावळ्या आणि गळ्यात हार घालून फोटो काढत आहेत. त्यांच्या सीबतच अभिनेत्री विद्यासागर ही देखील फोटो काढण्यात गुंतलेली फासून येते. या व्हिडीओ वरून अनेक वृत्त माध्यमातून विराजस आणि शिवानीचे लग्न झाले असल्याचे सांगितले जात आहे.
यावरून या दोघांना त्यांच्या चाहत्यांनी भरभरून अभिनंदनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. मात्र हा व्हिडीओ त्यांच्या लग्नातला नसल्याचे नुकतेच समोर आले आहे. स्वतः विराजसनेच या व्हिडिओबाबत खुलासा केला आहे. आमचे लग्न झाले नसून हे केवळ एका जाहिरातीचे शूटिंग होते असे त्याने स्पष्टीकरण दिले आहे. पीएनजी ज्वेलर्सची ही नवी जाहिरात आहे ज्यात शिवानी आणि विराजस मध्यवर्ती भूमिकेत पाहायला मिळत आहेत. तर राधिका विद्यासागर या देखील या जाहिरातीत महत्वाच्या भूमिकेत आहेत. शिवानी आणि विराजस यांचा साखरपुडा झाला असल्याने अनेकांनी ह्या व्हिडिओवरून त्यांचे लग्न झाले असावे असा गैरसमज करून घेतला आहे. मात्र ह्या चर्चाना विराजसच्या उत्तराने आता पूर्णविराम दिला जाणार आहे.
सध्या हे दोघेही आपल्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहेत. माझा होशील ना या मालिकेनंतर विराजस दिग्दर्शनाकडे वळला आहे. व्हीकटोरिया या आगामी चित्रपटाबाबत त्याने काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती. सोनाली कुलकर्णी, पुष्कर जोग आणि आशय कुलकर्णी हे कलाकार व्हीकटोरिया चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारणार आहेत. ही एक रहस्यमय कथा आहे ज्यातून अनेक रहस्य उलगडताना पाहायला मिळणार आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असल्याने विराजस आणि शिवानी दोघेही सध्या व्यस्त असलेले पाहायला मिळतात. आपल्या या व्यस्त शेड्युल मधून एखाद दुसऱ्या जाहिरातीतून येण्यासाठी धडपडताना पाहायला मिळतात याच निमित्ताने हे दोघेही आज पुन्हा एकदा चर्चेत राहिलेले दिसून आले आहेत.