अभिनेता कुशल बद्रिके आणि डायरेक्टर लेखक विजू माने हे जिगरी मित्र.. आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टीतून धमाल मस्ती खोड्या करीत जगण्यातली पुरेपूर मजा हे दोघेजण नेहमीच घेत असतात. ठाण्यात कामानिमित्त फिरत असताना उन्हाचे चटके जाणवू लागल्याने दोघे काहीतरी थंड घेण्यासाठी पंचपाखाडी परिसरातील एका नावाजलेल्या हॉटेलमध्ये गेले. अगोदर त्यांनी बिअर घेण्याचे ठरवले पण हो नाही करत थंड फ्रेश लाईम सोडा आणि फ्रेश लाईम वॉटरची ऑर्डर फार्मवली. शेवटी वेटरला बिल आणायला सांगितलं तेव्हा त्यांना बिल पाहून आश्चर्याचा धक्काच बसला. ह्याही छोट्याश्या गोष्टीचा आनंद लुटता यावा म्हणून त्यांनी सोशिअल मीडियावर फोटो अपलोड करत विनोदी पोस्ट लिहली.
विजू माने यांनी आपल्या सोशिअल मीडियावर ते बिल सह एक लिहलेला विनोदी अनुभव शेअर करत म्हणतात “मी कुशलला म्हणालो, दुपारी उन्हाचे चटके लागत आहेत म्हणून मस्त बीयर मारुया. तो म्हणाला, नको त्यापेक्षा आपण लिंबू पाणी पिऊ. म्हणून आम्ही लिंबू पाणी प्यायलो. आणि लक्षात आलं त्यापेक्षा बिअर स्वस्त आहे आता उन्हाचे चटके मनाला लागत आहेत. हे गोव्यात नव्हे ठाण्यात आहे.” फ्रेश लाईम सोडा आणि फ्रेश लाईम वॉटर ह्या दोन्हीचे मिळून ३२५ रुपये इतकं बिल आलं. लिंबू पाणी पेक्षा बिअर स्वस्त असं त्यांचं म्हणणं असलं तरी ते लिंबू पाणी जर तुम्ही महागड्या हॉटेलात घेतलं तर ते तुम्हाला महागच पडणार असं अनेकांनी कमेंट करत सुनावलं. तर काहींनी त्यांच्या या विनोदाची मजा घेत आधी आम्हाला हे सांगा कि ह्यातलं फ्रेश लाईम सोडा कोण प्यायलं आणि कोण फ्रेश लाईम वॉटर प्यायलं. अशाच धम्माल गोष्टी हे दोघे नेहमी करत असतात.. यात कुशलची पत्नी सुनयनाही यांच्या विनोदाची बकरा होताना दिसते..
हे दोघे माशांवर ताव मारत आहेत आणि बिचाऱ्या सुनयना वहिनींची मोकळी प्लेट पाहून “माझ्या बायकोची डिश अजुन यायची आहे.” अशी मजेशीर पोस्ट टाकतो.. या सहज विनोदांवर नेटकरी भलतेच खुश होऊन कमेंट करत असतात. कुशल भाऊ खुशाल भाऊ.. तुमच्या अचाट डोक्यात या खतरनाक आयडिया कशा येतात.. खरच तुमच्या पुढ्यात हात टेकायचे की डोकं? आईसक्रीम खातानाचा असाच एक विनोदी फोटो कुशलने शेअर केला आहे, त्यावर तो लिहितो “When I asked her बघु गं जरा, कसं लागतंय! ” त्यावर नेटकरी म्हणतात वहिनीला विचारु नका दादा, नाहीतर तुम्हाला लय लागंल.. सुनयना आणि कुशल बैलांच्या ऐवजी नांगर ओढतानाचा फोटोही धमाल आहे, त्यावर तो लिहितो “तुम साथ हो, तो मै हर बात का हल ढुंढ लुंगा” जीवनातील छोट्या छोट्या गोष्टीतून घडणारे हे विनोद चाहत्यांना नेहमीच आनंदचे क्षण अनुभवायला देतात.. सिरिअस राहण्यापेक्षा हे कधीही चांगलंच नाही का !