Breaking News
Home / जरा हटके / ​”टीप टीप बरसा पाणी” शूटिंगच्या वेळी रविना टंडनने हाकलले होते ‘या’ ११ वर्षाच्या मुलाला, आज तोच मुलगा आहे बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध अभिनेता…
tip tip barsa pani ravina akshay and ranveer singh
tip tip barsa pani ravina akshay and ranveer singh

​”टीप टीप बरसा पाणी” शूटिंगच्या वेळी रविना टंडनने हाकलले होते ‘या’ ११ वर्षाच्या मुलाला, आज तोच मुलगा आहे बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध अभिनेता…

बॉलिवूड क्षेत्रात कलाकारांची वैयक्तिक आयुष्यातील कहाणी कधीच लपून राहत नाही. कलाकार जेव्हा पडद्यावर झळकतो तेव्हा तो प्रेक्षकांच्या मनात ठसला जातो. त्याची सर्वत्र ओळख वाढत जाते. पण या पडद्यावर येण्यासाठी काही कला​​कार खूप हाल अपेष्टा सोसतात. दिवसरात्र मेहनत घेतात, पण कधी कधी त्यांच्या आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की त्याचा त्यांना कधीच विसर पडत नाही. ध्येय साध्य झाल्यावर सुद्धा त्या गोष्टी त्यांच्या स्मरणात राहतात आणि मग कधीतरी अचानक त्या मनातून ओठांवर येतात. तेव्हा त्या गोष्टी जगासमोर मांडल्या जातात.

प्रत्येकाच्या आयुष्यात एक दिवस असा असतोच जो कधीच आठवणींतून मावळत नाही. तो दिवस किंवा ती आठवण वेळोवेळी आपणास आठवते. प्रत्येक यशस्वी माणसाच्या जीवनात ती अविस्मरणीय आठवण असतेच आणि आपण ती सतत आठवतो. मित्रहो आज आपण अशाच एका यशस्वी अभिनेत्याच्या आयुष्यातील छोटासा किस्सा जाणून घेणार आहोत तर तुम्ही हा लेख पूर्ण वाचा जेणेकरून तुम्हाला देखील तो किस्सा समजेल. बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडन हिने अनेकांची ह्रदय जिंकली आहेत. आजही तिच्या सौंदर्याबद्दल चर्चा होत राहते. तिने भरपूर चित्रपटात काम केले असून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

superstar ranvir singh
superstar ranvir singh

१९९४ मध्ये तिच्या मोहरा चित्रपटाची शूटिंग चालू होती. त्यावेळी ” टीप टीप बरसा पाणी…” या गाण्याचे शूटिंग घेत असताना तिथे सेटवर एक लहान मुलगा रविनाचे शूटिंग पाहत बसला होता पण रविनाने निर्मात्यांना सांगून त्याला तिथून बाहेर काढले होते. ​चित्रीकरण पाहणारा ​तो मुलगा ​अवघ्या ११ वर्षाचा होता, वेळ सरत गेली ​अन पुढे  तोच मुलगा नाना संकटांवर मात करीत बॉलिवूड मधील सुपरस्टार बनला आहे, त्याची पत्नी देखील हिंदी चित्रपट सृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री आहे. अशा या सुपरस्टारचे नाव आहे रणवीर सिंग आहे. रणवीर च्या खोडकर आणि जॉली स्वभावावर मुली भाळून आहेत, त्याचा बाजीराव मस्तानी मधील अभिनय वाखाणण्या सारखाच आहे. आता पर्यंत तुम्ही रणवीरच्या पत्नीचे नाव म्हणजेच दीपिका पादुकोन हिला ओळखलेच असेल.

रणवीर रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवत आहे, पण इथवर येण्यासाठी त्याने अपार कष्ट केले आहेत. थिएटरमध्ये तो बॅक स्टेज कलाकारांना चहा आणून देत असे तसेच त्यांच्यासाठी खुर्च्या लावणे ​यासारखी पडेल ती कामे तो करायचा. ​कला अवगत होण्यासाठी ​खूप मेहनत घ्यायचा, त्याच्या याच मेहनतीचे फळ ​मिळाले ते ​२०१० मध्ये​,​ आदित्य चोप्राने त्याला फिल्म ” बँड बाजा बारात ” यामध्ये ​अनुष्का शर्मा सोबत हिरो म्हणून रोल मिळाला. यातील त्याची भूमिका भरपूर गाजली​, सहजरित्या केलेला अभिनय चित्रपटातील हिरोच्या पात्राला खूपच शोभून दिसत होता ​आणि चित्रपट सृष्टीत अभिनेत्याच्या रुपात तो नावारूपाला आला. त्यानंतर त्याने पुन्हा मागे वळून पाहिले नाही​, यशाची अनेक शिखरे त्यांनी लीलया गाठली..​

ranveer singh wife deepika padukone
ranveer singh wife deepika padukone

कॉफी वि​थ करण या शो मध्ये रविना टंडन ने त्याला सेटवरून हाकलून लावलेला किस्सा सांगितला होता. आज रणवीर लाखो हृदयाची धडधड आहे, पण त्याने केलेल्या मेहनतीमुळेच तो आता ​सुपरस्टार आहे. त्यावेळी रणवीर ११ वर्षाचा ​लहानगा ​होता आणि तो शूटिंग बघत होता पण त्याला हाकलून लावले होते. रविनाने असे का केले याचाही खुलासा तिने स्वतः केला होता. त्यावेळी रविनाचे मोहरा चित्रपटातील अक्षय कुमार सोबत टीप टीप बरसा पाणी या पावसात भिजतानाच्या गाण्याचे शूटिंग चालू होते आणि हे गाणे खूपच सेन्शुअल आहे. याच गाण्यावर अलीकडच्या काळात अक्षय सोबत कतरीनाने देखील गाणे शूट केलेले आहे. अशा गाण्याची शूटिंग लहान मुलांनी प्रत्यक्ष पाहू नये असे रविनाला वाटले होते म्हणून तीने निर्मात्यांना सांगून रणवीरला सेटवरून हाकलले होते.

पण आजही रणवीर रविनाला कधी भेटला तर अगदी गमतीने या घटनेचा उल्लेख जरूर करतो. पण तेव्हा रविनाने जे केले ते योग्यच होते​ असेही निखळ मनाने कबुल करतो​, ​कदाचित अशा स्वभावामुळेच तो कमी कालावधीत सुपरस्टार झाला असावा.​ लहान मुलांच्या मनावर अशा प्रकारच्या सीनचा खूप वेगळा परिणाम ​होऊ शकतो त्यामुळे त्यांना त्यांच्या वयानुसार चित्रपट पाहायला लावणे ही पालकांची जबाबदारी असते. त्यांची कल्पना शक्ती ​तल्लख असल्यामुळे आपण त्यांना काही तरी शिक्षण घेता येईल असे दृश्य दाखवणे गरजेचे असते. तर मित्रहो रणवीर आणि रविनाचा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा तसेच हा लेख आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा.

bollywood actor ranveer singh
bollywood actor ranveer singh

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.