सोशल मीडियाच्या माध्यमातून कधी कोण प्रसिद्धीस येईल आणि कधी कोण आपला निर्णय बदलून टाकेल हे सांगता येत नाही. अगदी गरीबातला गरीब माणूस देखील इथे सोशल मीडियावर रातोरात प्रसिद्धी मिळवतो हे अनेकांनी पाहिलं असेल आणि याच लोकांच्या मदतीने तो व्यक्ती भरघोस मदत देखील मिळवतो हे अनेकांनी अनुभवले आहे. सोशल मीडियाचा इफेक्ट कोणाला प्रसिद्धी मिळवून देतो तर कोणाला टीकेच्या धारेवर धरतो हे बऱ्याचदा घडलं आहे मात्र याच सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रोल केल्याने चक्क अमिताभ बच्चन यांनी देखील आपले मदत बदलवले आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात..
काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी कमला पसंद पान मसाल्याची जाहिरात केली होती. ही जाहिरात टीव्ही माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. या जाहिरातीत अमिताभ बच्चन यांच्या सोबत रणवीर सिंग देखील झळकला होता. मात्र अमिताभ बच्चन या जाहिरातीत असल्यामुळे ते आता टीकेचे धनी ठरत आहेत. त्यांच्या सारखे एवढे मोठे कलाकार ज्यांचा आजही समाजात खूप मोठा आदर आहे अशा व्यक्तीने कमला पान मसाल्याची ऍड करणे कितपत योग्य आहे? असा सवाल त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केला आहे. या जाहिरातीमुळे त्यांच्यावर नेटकऱ्यांनी टीकेची धार उठवली आहे. एवढे पैसे कमवून देखील अमिताभ बच्चन यांनी ही ऍड का करावी? त्यांना पैशांची एवढी कमी जाणवू लागली की ते आता लोकांना पान मसाला खायला भाग पाडू लागले आहेत. समाजसपुढे आदरस्थान असलेल्या व्यक्तीने अशा जाहिराती करणे कितपत योग्य आहे? अशा स्वरूपाच्या टीका त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून होत आहेत.
वेगवेगळ्या पोस्टवरून त्यांनी त्यांच्या चाहत्यांना मी फक्त सुंगधी सुपारीची जाहिरात केली आहे, गैरसमज करून घेऊ नका असेही आवाहन केले होते. परंतु नेटकरी त्यांच्या खुलाशाच्या बाजूने दिसले नाहीत. आपल्यावर होणाऱ्या टीकेचे गांभीर्य लक्षात घेऊन अमिताभ बच्चन यांनी नुकताच आपला निर्णय बदलला आहे. त्यांनी स्वतः कमला पसंद सोबत जो करार केला होता तो रद्द केला आहे आणि प्रमोशनसाठी जेवढे मानधन त्यांनी घेतले होते ते सर्व पैसे देखील परत केले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या ह्या निर्णयाची सर्वत्र चर्चा होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून एका भल्या मोठ्या व्यक्तीचेही मतपरिवर्तन घडवून आणण्याची ताकद काय आहे हे या उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल.