द केरळ स्टोरी हा चित्रपट शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या वादग्रस्त कथानकावरून राजकीय गोंधळ चिघळला होता. मात्र तरीही पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी हा चित्रपट उचलून धरला असल्याचे समोर आले. अदा शर्मा या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. काही लोकांनी चित्रपटाला राजकीय पक्षाचा प्रचार म्हटले आहे, तर काहींनी वास्तव उघड केल्याबद्दल चित्रपट निर्मात्याचे आभार मानले आहेत. सुदीप्तो सेनच्या या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्सऑफिसवर सुमारे ६ कोटी ५० लाखांची दणदणीत कमाई केली आहे. गेल्या वर्षीच्या द काश्मीर फाइल्सच्या तुलनेत या चित्रपटाने पहिल्या दिवशी थोडी जास्त कमाई केली आहे.
काश्मीर फाइल्सने रिलीजच्या पहिल्या दिवशी ३.५५ कोटी कमावले होते. अनुपम खेर अभिनित द काश्मीर फाइल्सला २०२२ मध्ये विविध स्तरावर विरोध मिळाला होता, जो आदा शर्माच्या चित्रपटाला आता मिळत आहे. दोन्ही चित्रपट राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या विषयांवर आधारित आहेत. याचे पडसाद आता राजकिय वर्तुळात देखील उमटलेले आहेत. केरळचे भाजप अध्यक्ष के सुरेंद्रन या चित्रपटाबाबत म्हणाले की, भारतीय किनारपट्टीच्या राज्यातील अनेक चित्रपटगृहांनी मुद्दामहून हा चित्रपट प्रदर्शित केला नाही. राज्यात चित्रपट प्रदर्शित न करण्यासाठी काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी चित्रपटगृहांच्या मालकांना धमकावल्याचा आरोप देखील केला आहे. केरळमधील सत्ताधारी सीपीआय आणि विरोधी काँग्रेसच्या म्हणणे खूपच धक्कादायक आहे.
चित्रपटात ३२००० महिलांचे धर्मांतर आणि कट्टरतावादी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. आणि त्यांना भारत आणि जगभरातील दहशतवादी मोहिमांमध्ये तैनात करण्यात आले आहे. हिंदू धर्मीय शाळा कॉलेज मधील मुलींसोबत घडणाऱ्या रोजच्या घटना खूपच बोलक्या आहेत. यावर विविध स्तरावर समाज प्रबोधन देखील मोठ्या प्रमाणात केले जात आहे. हे वास्तव दाखवण्याचा प्रयत्न चित्रपटात करण्यात आल्याने हा चित्रपट प्रत्येक गावातील मुलींनी पाहावा अशी मागणी केली आहे. हिंदू मुलींचे धर्मपरिवर्तन करून त्यांचे कसे मतपरिवर्तन केले जाते हा मुद्दा या चित्रपटात मांडण्यात आला आहे. याबाबत कंगना राणावत हिनेही तिचे मत व्यक्त करताना म्हटले आहे की, मी हा चित्रपट पाहिला नाही.
पण चित्रपटावर बंदी घालण्याचा खूप प्रयत्न झाला. चित्रपटावर बंदी घालता येणार नाही असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. मला असे वाटते की चित्रपटातून कोणताही वाईट मार्ग दाखवण्यात आला नाही, तर फक्त आयएसआयएसवर उघडपणे बोललं जात आहे, बरोबर? देशातील सर्वात जबाबदार संस्था हायकोर्ट जर असे म्हणत असेल तर ते बरोबर आहेत. आयएसआयएस ही दहशतवादी संघटना आहे. असे नाही की मी त्यांना दहशतवादी म्हणत आहे, आपला देश, गृह मंत्रालय आणि इतर देशांनीही त्यांना तसे म्हटले आहे. जे सत्य आहे त्यावरच हा चित्रपट प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत आहे.