Breaking News
Home / मराठी तडका / शेतकऱ्याच्या हातात नगद दिली तर तो जत्रेत खर्च करेल.. प्रवीण तरडेने मांडले छत्रपती शिवाजी महाराजांचे धोरण
pravin tarde chhatrapati shivaji maharaj
pravin tarde chhatrapati shivaji maharaj

शेतकऱ्याच्या हातात नगद दिली तर तो जत्रेत खर्च करेल.. प्रवीण तरडेने मांडले छत्रपती शिवाजी महाराजांचे धोरण

बलोच हा ऐतिहासिक चित्रपट ५ मे रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केले आहे. प्रवीण तरडे आणि स्मिता गोंदकर चित्रपटात प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत. सीमेपार लढलेल्या वीर मराठ्यांची विजयगाथा बलोच चित्रपटात रेखाटण्यात आली आहे. चित्रपटाच्या निमित्ताने कलाकार मंडळींनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी प्रवीण तरडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे शेतकऱ्यांबद्दलचे धोरण कसे आखायचे याचा उलगडा केला. प्रवीण तरडे म्हणतात की, महाराज कसे होते हे आपल्याला इतिहासाच्या पुस्तकातूनच कळले आहेत.

pravin tarde chhatrapati shivaji maharaj
pravin tarde chhatrapati shivaji maharaj

महाराजांच्या हातातील तलवार जास्त दाखवली तर महाराजांच्या हातातला नांगर त्यामानाने कमी दाखवला. माझा कुठलाही सिनेमा असुदे मी शेतकऱ्यांचा मुद्दा प्रकर्षाने मांडत आलेलो आहे. मी परदेशात जरी गेलो तरी तिथल्या शेतकऱ्यांना जास्त भेटतो. आधुनिक शेतीची जोड आणि त्यांची प्रगती मांडण्याचा प्रयत्न करतो. यागोष्टींचा आपल्या शेतकऱ्यांनी जरूर फायदा करून घेतला पाहिजे. शिवाजी महाराजांचं शेतकऱ्यांबद्दलचं धोरण हे इतकं भन्नाट होतं ते आपल्याला कमी प्रमाणात दाखवलं गेलं. त्यांची शेतीची जी पद्धत होती ती आपल्या कुठल्याच सरकारनं अमलात आणलीये असं मागच्या ७० वर्षात दिसत नाही. महाराजांचे धोरण होते की शेतकऱ्यांच्या हातात आपण कधी पैसा दिला नाही पाहिजे. त्याऐवजी शेतीला लागणारी अवजारे, खतं, बी बियाणे दिले पाहिजेत.

pravin tarde baloch movie
pravin tarde baloch movie

छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका पत्रात स्पष्ट उल्लेख आहे की जर शेतकऱ्याच्या हातात नगद दिली तर तो यात्रे जत्रे साठी खर्च करेल. पोरीच्या लग्नासाठी दारात मांडव घालेल. म्हणून ते शेतकऱ्यांना पैसे नाही द्यायचे. म्हणूनच नांगर, बैल, खत असे ते देत होते. शेतीची कामं संपली की बैलजोडी, नांगर ते काढूनही घ्यायचे. अशी जी रुजलेली ऐनजिन्नस पद्धत होती ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात खूप मोठा विषय होता. म्हणून शिवछत्रपतींच्या काळात शेतकऱ्यांची आत्महत्या होत नव्हती. राजाच इतका संपन्न होता की तो जनतेची काळजी घेत होता. म्हणूनच जर ही ऐन जिन्नस पद्धत जर आज अवलंबली तर कदाचित शेतकऱ्यांच्या हिताचं काहीतरी घडू शकेल. माझ्या हातातून हे मी चित्रपटातून दाखवलं. शेतकऱ्यांच्या बद्दलचा शिवरायांचा दृष्टीकोण मी चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.