अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडिओत तेजश्रीने आपल्या ओठावरची लिपस्टिक पुसून काढत बॅन लिपस्टिक हा तिने सुरू केलेला नवा ट्रेंड सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. ‘मी लिपस्टिकचं समर्थन करत नाही’ असं म्हणत हॅशटॅग बॅन लिपस्टिक हा ट्रेंड तेजस्विनी मुळे खूपच चर्चेत आला. तेजस्विनी पाठोपाठ अभिनेत्री सोनाली खरे, अदिती सारंगधर, स्मिता गोंदकर, प्रजक्ता माळी यांनी देखील हा ट्रेंड सुरू करून तेजस्विनी पंडितला पाठिंबा दर्शवला.
मात्र हा ट्रेंड नेमका कोणत्या कारणावरून सुरू झाला आणि लिपस्टिक बॅन करण्यामागे नेमके कारण काय असा प्रश्न प्रेक्षकाना पडला होता. यातून अनेकांनी हा पब्लिसिटी स्टंट असावा असा अंदाज बांधला होता तर अनेकांनी तिच्या आगामी प्रोजेक्ट बाबत शक्यता वर्तवली होती. बॅन लिपस्टिक मागे नेमके कोणते कारण आहे याचा उलगडा आता झालेला पाहायला मिळतो आहे. Kill you soon “अनुराधा” या वेबसिरीजचे मोशन पोस्टर शेअर करून तेजस्विनी पंडित ने आपल्या आगामी प्रोजक्टची माहिती दिली आहे. अनुराधा ही वेबसीरिज लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वेबसिरीजच्या या मोशन पोस्टरवर लिपस्टिकचं चित्र आहे. Kill you soon अनुराधा या वेब सिरीज धुरा संजय जाधव यांनी सांभाळली आहे. या वेबसिरीजमध्ये कोणकोणते कलाकार झळकणार आहेत याचा खुलासा अजून झालेला नाही मात्र ह्या बॅन लिपस्टिकच्या ट्रेंड मागे ज्या अभिनेत्रींनी पाठिंबा दर्शवला होता ते कलाकार ह्या प्रोजेक्टमधून झळकतील असा अंदाज प्रेक्षकांकडून बांधला जात आहे.
त्यामुळे या वेबसिरिजमध्ये तेजस्विनी पंडित सोबत सोनाली खरे, अदिती सारंगधर, प्राजक्ता माळी ह्या नायिका पाहायला मिळणार अशी शक्यता आहे. याबाबत अधिक खुलासा लवकरच करण्यात येईल मात्र या वेबसिरीजचे प्रमोशन सोशल मीडियावर दणक्यात झाले आहे असे म्हणायला हरकत नाही. असे हटके प्रमोशन करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही कारण या अगोदर देखील चित्रपट आणि नाटकांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रेक्षकांमध्ये चर्चेत राहण्यासाठी असे प्रमोशन करण्यात आले आहेत हा देखील त्यातलाच एक बगग असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. दरम्यान अनुराधा या वेबसिरीजची आता जोरदार प्रसिद्धी झाली आहे मात्र या बॅन लिपस्टिकमागे अनुराधाचे काय कनेक्शन आहे याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. लवकरच या अनुराधाचा प्रवास प्रेक्षकांसमोर येईल पण त्यासाठी थोडीशी वाट पाहावी लागणार आहे.