Breaking News
Home / मराठी तडका / तेजश्री प्रधानचा नवा प्रोजेक्ट.. तेजश्रीसोबत झळकणार चला हवा येऊ द्या मधली चिमुरडी
tejashri pradhan keya ingle
tejashri pradhan keya ingle

तेजश्री प्रधानचा नवा प्रोजेक्ट.. तेजश्रीसोबत झळकणार चला हवा येऊ द्या मधली चिमुरडी

मराठी सृष्टीत अभिनयाच्या जोडीला निर्मिती क्षेत्रात उतरण्याचे धाडस अनेक अभिनेत्रींनी केलेलं आहे. तेजश्री प्रधान ही देखील त्यातलीच एक. होणार सून मी ह्या घरची मालिकेतील जान्हवीच्या भूमिकेने लोकप्रियता मिळवणारी तेजश्री पुढे जाऊन हिंदी चित्रपटातून आपले नशीब आजमावताना दिसली. त्यात तिला थोड्याफार प्रमाणावर यशही मिळाले. अग्गबाई सासूबाई मालिकेनंतर तेजश्री प्रधान काही मोजक्या प्रोजेक्टमधुन प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्यामुळे तिचा एखादा मोठा प्रोजेक्ट लवकरात लवकर यावा अशी चाहत्यांची इच्छा होती. चाहत्यांची ही ईच्छा आता लवकरच पूर्ण होणार आहे. कारण आता तेजश्री लवकरच एका कौटुंबिक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

tejashri pradhan keya ingle
tejashri pradhan keya ingle

बऱ्याच प्रतीक्षेनंतर तेजश्री एका कौटुंबिक चित्रपटाचा भाग बनणार आहे. आनंद गोखले दिग्दर्शित हॅशटॅग तदेव लग्नम या चित्रपटाच्या शुटिंगचा मुहूर्त सोहळा काल कलाकारांच्या उपस्थितीत पार पडला. या चित्रपटात सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. हॅशटॅग तदेव लग्नम हा एक कौटुंबिक चित्रपट आहे. त्यामुळे सुबोध भावे सोबत तेजश्रीची केमिस्ट्री कशी जुळून येते हे पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक आहेत. नुकतेच तेजश्रीने आपल्या या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. काल गुरुवारी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली. या चित्रपटात तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे सोबत बालकलाकार केया इंगळे सुद्धा झळकणार आहे. केया इंगळे ही सोशल मीडिया स्टार आहे.

keya ingle tejashri pradhan
keya ingle tejashri pradhan

पुना गाडगीळच्या जाहिरातीत केयाला अभिनयाची संधी मिळाली होती. केयाचा इंस्टाग्रामवर तीन लाखांहून अधिक फॅनफॉलोअर्स आहे. एवढ्या कमी वयात विनोदी अभिनयाची जाण आणि चेहऱ्यावरचा निरागसपणा तिच्या चाहत्यांना चांगलाच भावला आहे. हे पाहून केयाला चला हवा येऊ द्या या शोमध्ये झळकण्याची नामी संधी मिळाली. चला हवा येऊ द्या या शोमध्ये सध्या हे बालकलाकार प्रेक्षकांना हसवण्याचे काम करत आहेत. या शोमध्ये झळकत असलेल्या केयाला आता चित्रपटात झळकण्याची नामी संधीच मिळालेली आहे. हॅशटॅग तदेव लग्नम या चित्रपटातून केया इंगळे प्रथमच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे, तेही तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे सोबत. त्यामुळे या भूमिकेसाठी केया खूपच उत्सुक असलेली पाहायला मिळते.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.