Breaking News
Home / जरा हटके / आयुष्य तुला कुठे घेऊन जाईल हे महत्त्वाचं नाही.. लेकीच्या वाढदिवशी स्वप्नील भावुक
swapnil joshi daughter maayra birthday
swapnil joshi daughter maayra birthday

आयुष्य तुला कुठे घेऊन जाईल हे महत्त्वाचं नाही.. लेकीच्या वाढदिवशी स्वप्नील भावुक

मराठी सृष्टीतला चॉकलेट हिरो अशी ओळख बनवलेल्या स्वप्नील जोशीच्या लाडक्या लेकीचा म्हणजेच मायराचा आज सातवा वाढदिवस आहे. मायराला अनेकदा मुलाखतीतून सोशल मीडियावरून प्रेक्षकांनी पाहिलेलं आहे. एवढूशा वयातला तिचा समजुतदारपणा सुद्धा प्रेक्षकांनी अनुभवला आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्ताने स्वप्नीलने आपल्या या लाडक्या लेकीसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. आयुष्य तुला कुठे घेऊन जाईल हे महत्त्वाचं नाही पण तुझ्यासोबत आमचं आणि स्वामींचं मनापासून प्रेम, आशीर्वाद राहील हे तो त्यात आवर्जून उल्लेख करताना दिसतो. लाडक्या लेकिसोबतचे काही खास फोटो शेअर केले.

swapnil joshi daughter maayra birthday
swapnil joshi daughter maayra birthday

स्वप्नील भावुक होऊन म्हणतो की, प्रिय मायरा, आज खास दिवस आहे. आयुष्यातील सात वर्ष पूर्ण झाल्याचा पहिला मैलाचा दगड आहे. अगदी कालच घडले असं वाटत होतं, जेव्हा तुला पहिल्यांदा माझ्या मिठीत धरलं होतं. तुझी चिमुकली बोटं आणि नाजूक शरीरयष्टी पाहून मी आश्चर्यचकित झालो होतो. लवकरच तू तरुण्याकडे वाटचाल करत आहेस! सरणारे प्रत्येक  वर्ष मौल्यवान क्षण आणि प्रेमळ आठवणींनी भरलेले आहे. तुझ्या पहिल्या पावलापासून ते मनमुराद हास्यापर्यंत, तू आमच्या जीवनात अपार आनंद आणलास! तुझ्यामुळे माझे जग प्रकाशित करून चैतन्य आणि कुतूहलाने भरून टाकले आहे. तुला शिकताना आणि वाढताना पाहणे हा माझ्यासाठी विस्मयकारक अनुभव होता. नवीन गोष्टी शोधण्याचा तुझा उत्साह आणि आव्हानांवर मात करण्याची तुझी जिद्द मला चकित करते.

maayra birthday special
maayra birthday special

तुझ्याकडील दयाळूपणा आणि इतरांबद्दल सहानुभूती असलेल्या चांगुलपणाची सतत आठवण करून देते. तू तुझ्या सातव्या वर्षाची सुरुवात करताना, माझी इच्छा आहे की तू मोकळ्या हातांनी आयुष्य स्वीकारत रहा. तु नेहमी स्वतःशी इमानदार राहा, आपली आवड जोपासत आणि अटळ स्वप्नांचा पाठपुरावा कर. सर्वात साध्या गोष्टींमध्ये आनंद मिळो आणि विलक्षण गोष्टींचा पाठलाग करण्याचे धैर्य नेहमीच तुझ्यात असू दे! लक्षात ठेव की आम्ही तुझ्यावर अपार प्रेम करतो. आयुष्य तुला कुठेही घेऊन जात असले तरी, हे जाणून घे की आजी आबा, आई बाबी आणि राघव व्यतिरिक्त, नेहमी स्वामी आबाचे समर्थन, मार्गदर्शन आणि प्रेम तुझ्या पाठीशी आहे. अशीच नेहमी आनंदी रहा, तुझे जग हसू, आनंद आणि अमर्याद शक्यतांनी भरले जावो.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.