Breaking News
Home / ठळक बातम्या / महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रसिद्ध कलाकार अडकला विवाहबंधनात
dattu more wedding
dattu more wedding

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रसिद्ध कलाकार अडकला विवाहबंधनात

महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. या शोमधून प्रसिद्धीस आलेला दत्तू मोरे हा नुकताच विवाहबंधनात अडकलेला आहे. दत्तूच्या जस्ट मॅरीड या कॅप्शनने त्यांच्या चाहत्यांचे लक्ष्य वेधून घेतले आहे. प्रिवेडिंगचे काही खास फोटो दत्तूने सोशल मीडियावर शेअर करताच सर्वाना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. कारण दत्तू एवढ्यात लग्न करेल याची कल्पनाही कोणी केलेली नव्हती. मात्र आता त्याच्या प्रिवेडिंग फोटोवर हास्यजत्राच्या कलाकारांनी सुद्धा त्याचे अभिनंदन केले आहे. अर्थात दत्तूने त्याच्या लग्नाची गोष्ट अतिशय खाजगीत राखून ठेवली होती. त्यामुळे त्याच्या लग्नाच्या बातमीने सर्व आश्चर्यकारक प्रतिक्रिया देत आहेत.

dattu more just married
dattu more just married

दत्तूने कोणासोबत लग्न केले हे अजून तरी त्याने गुलदस्त्यात ठेवलेलं आहे. दत्तू हा अतिशय गरिबीतून वर आलेला हरहुन्नरी कलाकार आहे. तीन बहिणी, आईबडील अशा मोठ्या कुटुंबात वावरताना त्यांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला आहे. ठाण्यातील रामनगर मधल्या छोट्याश्या चाळीत त्यांचे कुटुंब राहायचे. या चाळीला काही महिन्यांपूर्वीच दत्तूचे नाव दिलं गेलं. स्वर्गीय बाबासाहेब कांबळे हे माजी नगरसेविका आशाताई कांबळे यांचे पती यांनी दत्तुची अफाट लोकप्रियता पाहून चाळीचे नाव दत्तूच्या नावे करण्यास पुढाकार घेतला होता. त्यांचे कलाकारांवर विशेष प्रेम होते. दत्तूची मेहनत ते लहानपणापासून बघत आले होते. महाराष्ट्राची हास्यजत्रा या मोठ्या शोचा एक भाग आहे.

dattu more wedding
dattu more wedding

संपूर्ण महाराष्ट्र त्यावर भरभरून प्रेम करत आहे यावरून त्यांना ही कल्पना सुचली होती. चाळीला स्वतःचे नाव दिलं गेलंय हे कळताच दत्तू त्यावेळी खूप भारावून गेला होता. ज्या चाळीमध्ये आपण लहानाचे मोठे झालो आहे अशा चाळीला स्वतःचे नाव दिलं गेलंय हे बघून खूप भारी वाटतंय असे तो म्हणाला होता. यशाचा एकेक टप्पा पार करत दत्तूने त्याच्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. त्याचमुळे दत्तूने अचानक लग्न केल्याने सोशल मीडियावर त्याचाच बोलबाला पाहायला मिळत आहे. आश्चर्यचकित करणाऱ्या लग्नाच्या बातमीत महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम दत्तू मोरेच्या लाईफ पार्टनरचे अजूनही गुलदस्त्यात आहे. या हसतमुख नवदांपत्यास भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.