कलर्स मराठी वाहिनीवरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. मालिकेत अभ्या आणि लतीकाच्या नात्यात आता नंदिनीमुळे वाद होऊ लागले आहेत. हे वाद तात्पुरत्या स्वरूपाचे असले तरी, मुख्य खलनायिका मिस नाशिक आणि हेमाच्या कटकरस्थानामुळे मालिका आता रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. मालिकेत अगोदरच्या हेमाची एन्ट्री झाल्याने आता मालिकेचे प्रेक्षक मात्र भलतेच खुश झालेले आहेत. सततच्या मेकअप मुळे चेहऱ्यावर विपरीत परिणाम झाल्याने हेमाची भूमिका साकारणाऱ्या प्रमिती नरके हिने सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता.
मालिका सोडणे माझ्यासाठी खूप काठीण होते असे तिने त्यावेळी सांगितले होते. प्रमितीने नाट्यशास्त्र विषयाची पदवी मिळवल्यानंतर नाटकातून काम करण्यास सुरुवात केली होती. सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत तिची हेमाच्या भूमिकेसाठी निवड झाली. हेमाची विरोधी पात्र साकारत असताना तिने आपल्या अभिनयाची कसब पणाला लावली होती. त्यामुळे हेमाच्या भूमिकेचा प्रेक्षकांना प्रचंड राग यायचा. या भूमिकेने प्रमितीला अमाप प्रसिद्धी मिळवून दिली त्यामुळे हे पात्र अर्ध्यावरच सोडणे तिच्यासाठी खूप कठीण होते. मात्र मेकअपमुळे चेहरा अधिक बिघडू नये याची खबरदारी घेत मालिका सोडण्याचे ठरवले. हेमाच्या भूमिकेत रुळलेली प्रमिती जेव्हा मालिका सोडणार असे कळले त्यावेळी तिच्या चाहत्यांनी नाराजी दर्शवली होती.
प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेली हेमाच्या भूमिकेत दुसऱ्या कुणाला पाहणे प्रेक्षकांना मुळीच रुचले नाही. त्यामुळे आता मालिकेत प्रमितीने पुन्हा एकदा पदार्पण करून प्रेक्षकांना सुखद धक्का दिला आहे. अर्थात तिच्या एंट्रीलाच तिने आपली खेळी सुरू केलेली असल्याने लतिका आणि अभिमन्यू तिच्या ह्या नव्या डावात कितपत अडकणार की त्यातून सुखरूप निसटणार याची उत्सुकता जास्त आहे. जहागीरदारांचा वारस हेमाच्या पोटात वाढत असल्याचा डाव आता या हेमाने आखला आहे. लतिका तिचा हा डाव ओळखणार की नाही हे येत्या काही भागातुनच प्रेक्षकांच्यासमोर येणार आहे. तूर्तास मालिकेतील हेमाच्या भूमिकेत पुनःपदार्पण करणाऱ्या प्रमिती नरके हिचे अभिनंदन!