सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील देवकीचे पात्र विरोधी भूमिका दर्शवताना दिसत आहे. देवकी आणि शालिनी या मालिकेतून जयदीप आणि गौरीला सतत त्रास देताना दिसतात त्यामुळे आता ही गौरी रूप बदलून त्यांना अद्दल घडवताना दिसत आहे. देवकी आणि शालिनीचे डाव आता गौरी उधळून लावत असल्याने प्रेक्षक देखील या ट्विस्टमुळे खुश झाली आहेत. मालिकेतील देवकीची भूमिका मीनाक्षी राठोड हिने साकारली आहे. मिनाक्षीने सोशल मीडियावर आई होणार असल्याचे कळवले आहे तिच्या या गोड बातमीने तिच्या चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. मिनाक्षीने अभिनेता कैलाश वाघमारे यांच्या सोबत इंटरकास्ट मॅरेज केले होते.
काही महिन्यांपूर्वी तिने तिच्या आईला उद्देशून यासंदर्भात एक पोस्ट लिहिली होती. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष्य बेधून घेणारी ठरली होती. आपल्या बहिणींनी देखील आंतरजातीय विवाह केला पण आईने कुठलाच विरोध केला नाही आईच्या या समंजसपणाचा तिला खूपच हेवा वाटला होता. आंतरजातीय विवाह केल्यामुळे एका भावाने आणि आईने आपल्या लेकीचं आयुष्य संपवलं होतं यालाच अनुसरून तिची ही पोस्ट चर्चेत आली होती तेव्हा मिनाक्षी आणि तिच्या आईचे सर्वांनी कौतुक केले होते. मिनाक्षीने त्याच्यासोबत आपला संसार थाटला तो कैलाश वाघमारे मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीत चांगलाच नाव कमावताना पाहायला मिळाला आहे.
तानाजी या बॉलिवूड चित्रपटात कैलाशने काकांची भूमिका गाजवली होती. त्याच्या या भूमिकेचे खूप कसुटुक करण्यात आले होते. शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला, दिठी, एक पंजाब ये भी अशा अनेक दर्जेदार चित्रपट नाटकातून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मराठी सृष्टीत त्याने स्वतःची ओळख निर्माण केलीच आहे शिवाय हिंदी सृष्टीतही तो अनेक दर्जेदार नाटकातून काम करताना दिसतो. बाळाच्या आगमनाच्या चाहुलीनेच मीनाक्षी आणि कैलाश मनोमन आनंदून गेले आहेत. त्यासाठी त्यांचे खूप खूप अभिनंदन