अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची आई आणि अभिनेत्री मिताली मयेकर हिची सासू सीमा चांदेकर नुकत्याच विवाहबंधनात अडकल्या आहेत. सीमा चांदेकर या गेल्या अनेक वर्षांपासून मराठी चित्रपट, नाट्य तसेच मालिका सृष्टीशी जोडल्या गेलेल्या आहेत. सिद्धार्थ लहान होता तेव्हाच त्या नवऱ्यापासून वेगळ्या राहत होत्या. काही वैयक्तिक कारणामुळे त्यांनी पहिल्या नवऱ्यापासून घटस्फोट घेतला होता. सिद्धार्थ आणि सुमेधा ही दोन अपत्ये त्यांना आहेत. या दोन्ही मुलांचे शिक्षण त्यांचे पालनपोषण सीमा चांदेकर यांनी आपल्या खांद्यावर पेलले होते. मुलीचे लग्न आणि मुलाचे करिअर घडवण्यापर्यंत त्यांनी साथ दिली.

मात्र आता मुलगा त्याच्या संसारात सुखी आहे आणि आपण एकटे आहोत या विचाराने त्यांना घर खायला उठत होतं. अशातच आपल्यालाही या वयात एका जोडीदाराची गरज आहे हा विचार करून सीमा चांदेकर यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. काल मोजक्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत सीमा चांदेकर आणि नितीन यांनी थाटात दुसरे लग्न केले. या लग्नात त्यांची सून मिताली मयेकर आणि मुलगा सिद्धार्थ हजर होते. सासूच्या लग्नात मी हजर होते असे म्हणत मितालीने या लग्नाचे काही क्षण शेअर केले आहेत. त्यावर आता सेलिब्रिटींनी सुद्धा अभिनंदनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केलेली आहे. सीमा चांदेकर या नाटक, मालिका सृष्टीत कार्यरत होत्या. मुलांचे संसार नीट मार्गी लागलेत हे पाहून त्यांना नेहमीच आनंद होत होता.

सिद्धार्थ आणि मिताली यांनी मुंबईत घर घेतलं त्याच्या कामानिमित्त तो सतत मुंबईतच असल्याने सीमा चांदेकर पुण्यात एकाकी पडल्या होत्या. एकाकी आयुष्य घालवण्यापेक्षा आपल्या आधाराला जोडीदार हवा या विचाराने त्यांनी नितीन यांच्यासोबत दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला. सिद्धार्थने देखील आपल्या आईच्या या निर्णयाचे स्वागतच केले. आपल्या आईला एका जोडीदाराची गरज आहे हे माझ्या लक्षातच आले नाही गं. असे म्हणत त्याने एक खास पोस्ट आईसाठी लिहिली आहे. तर मितालीने देखील सासूच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. आपल्या सासूच्या दुसऱ्या लग्नासाठी मिताली भावुक होत म्हणते की, Happy married life सासूबाई! माझ्या सासूचं लग्न! किती सूना हे म्हणू शकतात की मी माझ्या सासूच्या लग्नात हजर होते?
I consider myself extremely lucky की मी हे अभिमानाने म्हणू शकते. खरंच मला अभिमान वाटते तुझा की हा एव्हढा मोठ्ठा निर्णय तू अगदी न डगमगता घेतलास. मला अभिमान वाटतो तुझ्या मुलाचा की तो सुद्धा खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभा राहिला. आणि मला अभिमान वाटतो या एका अतिशय कमाल कुटुंबाचा एक भाग असण्याचा. आजवर तू आमच्या सगळ्यांसाठी सगळं अगदी मनापासून केलंस. पण आता स्वतःसाठी जगण्याची वेळ आलीये. अशीच कायम आनंदात राहा, हसत राहा. बाकी आम्ही मुलं तुझ्यासोबत आहोतच. तुला आणि नितिन काकांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप प्रेम.