हिंदी बिग बॉसच्या घरात आजवर अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावलेली आहे. त्यात गेल्या आठवड्यात प्रसिद्ध अभिनेत्री सिमी गरेवाल यांनी सदस्यांना बोलतं केलेलं पाहायला मिळालं. ह्या वीकेंडला सुद्धा अशाच काही मजेशीर घटना तुम्हाला अनुभवायला मिळणार आहेर. नुकतेच या घरात प्रसिद्ध ज्योतिष सौरिश शर्मा यांनी हजेरी लावलेली पाहायला मिळणार आहे. आजच्या प्रोमोमध्ये, ज्योतिषी सौरिश शर्मा घराला भेट देतात. सीझनमध्ये आत्तापर्यंत स्पर्धकांनी ज्या समस्यांना तोंड दिले आहे त्याबद्दल सखोल विचार विनिमय करतात. सोबतच सौरिश शर्मा यांनी घरातील प्रत्येक सदस्याची भविष्यवाणी केलेली आहे. तर कोणाची कानउघडणी सुद्धा केली आहे.
प्रियांका चहर चौधरीशी बोलताना तिला अंकित गुप्तासोबत वेळ वाया घालवू नको असा सल्ला दिला आहे. त्यांनी याबाबत असा दावा केला की त्यांच्या नात्याचे भविष्य त्यांना कमकुवत दिसत आहे आणि म्हणूनच त्यांनी त्यावर लक्ष केंद्रित करू नये असे म्हटले आहे. मुझे आपके और अंकित के संबंध का भविष्य अच्छा नहीं दिख रहा. वेळ वाया गेला, सौरिशने असे म्हणत प्रियांकाची कानउघडणी केली. ज्योतिषी सौरिश निमृतला सांगतात की, तिच्या विश्वासाशी बरेच लोक खेळले आहेत, ज्याला निम्रत होकार देते आणि या मताशी सहमत आहे असे म्हणते. त्यांनी निम्रतचे तपशीलवार विश्लेषण केले आणि सांगितले की ती अशी व्यक्ती आहे जिला सर्जनशीलतेची भूक आहे आणि ती कधीही समाधानी नाही.
त्यानंतर ते शिवकडे वळतात आणि भाकित करतात की, एकदा शिवचे लग्न झाल्यावर तो आपल्या आयुष्यात अनेक मोठे बदल झालेले पाहील. ज्याचा त्याला पुढे जाऊन फायदा होईल. वयाच्या ३६ व्या वर्षी शिव आपलं नाव गाजवेल, आता त्याचं करिअर रनवेवर आहे मात्र लवकरच तो गगनभरारी घेईल. शिवने मराठी बिग बॉस जिंकला आहे. तुझ्या या निरागसतेचे अनेकजण चाहते आहेत. पण मी अजूनही सांगतो की तुझं विमान रनवे वर आहे, जे अजूनही उड्डाण घ्यायला सज्ज झालेलं नाही. पण एक खात्रीशीर गोष्ट नक्की सांगतो की सिम्मी गरेवालसोबत तू जे स्वप्न शेअर केलं होतं ते लवकरच पूर्णत्वास येईल. नोव्हेंबर २०२४ च्या आधी बॉलिवूड नाही पण मराठी चित्रपटात तू प्रमुख भूमिकेत झळकशील एवढी मला खात्री आहे.
तू तुझ्या विश्वासाने माणसं जमवली आहेस हा तुझा आपलेपणा कधीही जाऊ देऊ नकोस. एक गोष्ट पक्की आहे की, तू बिग बॉसच्या टॉप ४ मध्ये असणार आहेस. याव्यतिरिक्त आणखी एक रिऍलिटी शो तुझी वाट पाहत आहे. सौरिश शर्माची ही भविष्यवाणी ऐकताच घरातील सदस्यांनी शिव बद्दल सकारात्मकता दाखवली. त्याचे भविष्य उज्वल आहे हे पाहून टीना आणि सुमबुलला सुद्धा आनंद झाला.