आज २७ जानेवारी रोजी श्रेयस तळपदेचा वाढदिवस आहे. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून श्रेयस लोकप्रियता मिळवत आहे. श्रेयसचा सेट वरील दिलखुलास वावर पाहून संकर्षण कऱ्हाडे त्याचे नेहमीच कौतुक करताना दिसतो. आज वाढदिवसाचे औचित्य साधून संकर्षणने श्रेयसला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. दोस्त यार भाई कलाकार सहकलाकार, तू खरंच खूप चांगला आहेस. माझं तुझ्यावर खरंच खूप मनापासून निस्वार्थी प्रेम आहे. माझ्या मनात तुझ्याविषयी नितांत आदर आहे. आणि हे सगळं तू तूझ्या वागण्यातूनच मला वाटायला भाग पाडलं आहेस.

आजवर एक अनुभवी, यशस्वी अभिनेता म्हणुन तू माझ्यावर कधीही, एकदाही, वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्नं केला नाहीस. तु तुझ्या असण्याचं, वलयाचं माझ्यावर कधिही दडपण आणलं नाहीस. माझं कौतुकच केलंस आणि मुख्य म्हणजे माझ्या माघारी लोकांनी केलेलं माझं कौतुक मला येउन सांगीतलंस, तुझं मन खरंच खूप मोठं आहे. स्वत:च्या कामाविषयी आत्मविश्वास असलेले लोक ईतरांची निंदा करण्यात वेळ घालवत नाहीत असं म्हणतात तसा तू आहेस. तुझ्यासोबतच्या ह्या ७ महिन्यांच्या काळात मी तुला कुणाची निंदा करताना ऐकलं नाही. म्हणुनच माझ्या आयुष्यात आजवर जे जेष्ठं किंवा अनुभवी कलाकार आले ज्यांनी मला प्रेमानेच वागवलं. आणि माझ्या मनांत आयुष्यभराची आदराची जागा मिळवली त्यांच्या पंक्तीत तू आहेस आणि कायम राहाशील.