सलमान खानचे वडील सलीम खान हे बॉलिवूड इंडस्ट्रीत नामवंत निर्माते म्हणून परिचित होते. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत अरबाज, सलमान आणि सोहेल या तिन्ही मुलांनी इंडस्ट्रीत आपला चांगला जम बसवला. खरं तर बॉलिवूड इंडस्ट्री बऱ्यापैकी सलमानच्या हातात आहे असे म्हटले जाते. कोणत्या कलाकाराला काम द्यायचे आणि कोणाला डावलायचे याचे बरेचसे किस्से सलमान खान सोबत जोडलेले आहेत. बॉलिवूडचा हा भाईजान असा वागत असला तरी तो आपल्या कुटुंबाबाबत मात्र खूपच हळवा असलेला पाहायला मिळतो. आई वडिलांच्या खूप क्लोज असलेला सलमान त्याच्या भाच्या आणि पुतण्यांच्याही तेवढाच जवळचा आहे.

लहान मुलं तर त्याला खूप आवडतात. पुतण्यांच्या मजामस्तीत तर तो स्वतः सहभाग घेतो. त्याचा हा दिलखुलास अंदाज व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांना पहायला मिळालेला आहे. सलमानची भाची अलिझेह अग्निहोत्री हिचा लवकरच वाढदिवस येत आहे.अलिझेह २१ सप्टेंबरला २४ व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यानिमित्ताने सलमानने आपल्या भाचीसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. सलमानची ही पोस्ट अवघ्या दोन तासात लाखोंचे लाईक्स मिळवत आहे. सलमान खान आपल्या भाचीचा एक जुना फोटो शेअर करतो. आणि तीला सांगतो की, मामु पर एक एहसान करो, जो भी करना दिल और मेहनत से करना. ऑलवेज याद रखो, लाईफ में गो स्ट्रेट अँड टर्न राईट. ओन्ली कम्प्लिट विथ युअरसेल्फ.

फिट होने के चक्कर में सेम मत हो जाना, और अलग होने के चक्कर में सबसे अलग मत हो जाना. अँड मोस्ट इम्पॉरटंटली, एक बार जो तुमने कमीटमेंट करदी तो फिर मामु की भी नहीं सूनना. सलमान खानची ही पोस्ट अल्पावधीतच मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली आहे. आपल्या भाचीला तो सल्ला देताना तू ज्या निर्णयावर ठाम असशील तेव्हा तू माझंही ऐकू नकोस असे सांगत आहे. सलमानचा हाच अंदाज त्याच्या चाहत्यांना भावला आहे. सलमान खानची भाची ही अलविरा आणि अतुल अग्निहोत्री यांची कन्या आहे. अतुल अग्निहोत्री याने बॉलिवूड सृष्टीत सहाय्यक भूमिका साकारलेल्या आहेत. अलिझेह हिलाही मॉडेलिंगची आवड असून ती हिंदी इंडस्ट्रीत येण्यासाठी धडपडत आहे. पण एवढे मोठे हात पाठीशी असताना अलिझेहसाठी हे आव्हान नक्कीच सोपे असेल.