Breaking News
Home / जरा हटके / उंच माझा झोका मालिकेतली चिमुरडी रमा तब्बल १० वर्षाने आता दिसते अशी
unch maza zoka serial
unch maza zoka serial

उंच माझा झोका मालिकेतली चिमुरडी रमा तब्बल १० वर्षाने आता दिसते अशी

उंच माझा झोका ही झी मराठी वरची एक दर्जेदार मालिका म्हणून ओळखली जाते. २०१२ ला सुरू झालेली ही मालिका साधारण वर्षभर प्रेक्षकांचे मनोरंजन करत होती. स्त्री हक्क आणि समान अधिकार या चळवळीत पुढाकार घेतलेल्या रमाबाई रानडे यांच्या जीवन गाथेवर आधारित मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. चिमुरड्या रमाच्या भूमिकेत बालकलाकार तेजश्री वालावलकर झळकली होती, तर पुढे ही भूमिका स्पृहा जोशीने निभावली होती.

tejashree walavalkar unch maza zoka
tejashree walavalkar unch maza zoka

मालिकेत शैलेश दातार, विक्रम गायकवाड, कविता लाड, शरद पोंक्षे, शर्मिष्ठा राऊत, ऋग्वेदी प्रधान यांच्या महत्वपूर्ण भूमिका होत्या. काही दिवसांपूर्वीच मालिकेच्या निवडक कलाकारांचे रियुनियन पहायला मिळाले. यावेळी दिग्दर्शक वीरेंद्र प्रधान यांनी चिमुरड्या तेजश्रीला पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या समोर आणलं. रमा आता मोठी झाली असे म्हणत त्यांनी एक खास सेल्फी शेअर केला होता. मालिकेला दहा वर्षे पूर्ण होऊन काही काळ लोटला आहे. तेजश्री वालावलकर ही चिमुरडी आता कशी दिसते आणि ती काय करते याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच असेल. तेजश्रीबद्दल अशाच काही खास गोष्टी जाणून घेऊयात. तेजश्री वालावलकर ही पुण्यात लहानाची मोठी झाली. पुण्यातील हुजूरपागा गर्ल्स हायस्कुल मधून तिने आपले शिक्षण घेतले आहे.

tejashree walavalar
tejashree walavalar

आजी आणि नात या चित्रपटातून तेजश्रीने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते. या चित्रपटानंतर तेजश्री उंच माझा झोकामध्ये प्रमुख भूमिकेत झळकली. चिंतामणी चित्रपट आणि जिंदगी नॉट आऊट अशा आणखी काही मोजक्या प्रोजेक्टमधून तेजश्री प्रेक्षकांच्या भेटीला आली. तेजश्रीचा आताचा फोटो वीरेंद्र प्रधान यांनी शेअर करताच ही किती बदललीये अशा प्रतिक्रिया त्यांना मिळू लागल्या. तर काहींनी ती अजूनही तशीच क्युट दिसते असे म्हटले होते. दरम्यान या मालिकेच्या म्युजिकल टीजर निमित्ताने कलाकारांची पुन्हा एकदा भेट घडून आली. यावेळी कलाकारांनी मालिकेतील जुन्या आठवणींना उजाळा दिलेला पाहायला मिळाला.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.