दूरदर्शनवर जो गायनाचा शो, नृत्याचा शो दाखवतात तो फार आवडीने पाहतो. त्यातले बालकलाकार पुढे जाऊन एक सेलिब्रिटी सारखे जीवन जगत असतात. यांच्या जीवनात काय चालू आहे हे जाणून घेण्यास त्यांचे चाहते खूपच उत्सुक असतात. त्यांच्या वैयक्तिक जीवना बद्दल शक्यतो कुणालाच माहीत नसते. आज आपण ‘सा’रे’ग’म’प’ लिटिल चॅम्प या शो मधून प्रसिद्ध झालेला गायक रोहित राऊत ह्याच्याबद्दल जाणून घेऊया.
‘सा’रे’ग’म’प’ लिटिल चॅम्प या शो मधून प्रसिद्ध झालेला गायक रोहित राऊत हा सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. “खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनों ” असे म्हणत रोहित राऊतने आपल्या प्रेमाची कबुली दिली. त्याने हे स्पष्टपणे सांगितले नसले, तरी त्याचे क्यूट रिलेशनशिप सर्वांच्या समोर आले आहे. “सारेगमप लिटल चॅम्प” मधून प्रसिद्ध झालेला रोहित “इंङियन आयङॉल” मध्ये सुद्धा झळकला होता. तेव्हापासून रोहित राऊत हे नाव महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण देशभरात प्रसिद्ध झाले. त्याच्या आवाजाने त्याने अनेकांचे मन जिंकले होते. पण त्याची होत असलेली एक चर्चा…कोण आहे बरं ती मुलगी? रोहितच्या सोशल मीडियावर एक नजर टाकली तर आपल्याला समजेल की, तो सतत एका व्यक्तीसोबत क्वालिटी टाईम एन्जॉय करतो.
रोहित आणि जुईली हे नेहमीच एकमेकांसोबत कित्येक फोटोज् शेयर करतात. रोहित व जुईली यांच्या नात्यात नव्याने बहर येत असून ते रिलेशनशिपमध्ये एकमेकांसोबत खुश आहेत. “सारेगमप लिटल चॅम्प” मधील स्पर्धक आणि गायिका जुईली जोगळेकरच्या प्रेमात पडला आहे. सोशल मीडियावर सध्या या कपलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तुम्हांला ठाऊक आहे का, रोहित आणि जुईली यांचे नाते मागील 10 वर्षांपासून आहे. वेलेंटाईन ङे च्या दिवशी एकमेकांसोबतचे फोटोज् शेयर करून त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. विशेष म्हणजे जुईली ही सुद्धा एक गायिका असून “सूर नवा ध्यास नवा” या कार्यक्रमातून तिच्या सुमधुर गायनाने सर्व प्रेक्षकांचे चित्त वेधले आहे. या दोघांमधील केमिस्ट्री पाहून त्यांचे चाहते सुद्धा खुश आहेत. रोहीत आणि जुईली यांचे नाते असेच बहरत राहो.
दोघांनाही त्यांच्या जीवनात पावलोपावली संधी मिळू दे, अशी सदिच्छा…! रोहीत आणि जुईली ला त्यांच्या पुढील जीवनासाठी शुभेच्छा! तर आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळेल.