Breaking News
Home / बॉलिवूड / अभिनेता राकेश बापट बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात.. पहिल्या पत्नीला दिला घटस्फोट
rakesh bapat enggaged
rakesh bapat enggaged

अभिनेता राकेश बापट बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात.. पहिल्या पत्नीला दिला घटस्फोट

काही दिवसांपूर्वी करण जोहर होस्ट करत असलेल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील बिग बॉस या रिऍलिटी शोची पहिली विजेती दिव्या अग्रवाल ठरली. या रिऍलिटी शोमध्ये मराठमोळा अभिनेता राकेश बापट, निशांत भट्ट, शमिता शेट्टी, नेहा भसीन, प्रतीक सेहजपाल यासारखे तब्बल १३ कलाकार कंटेस्टंट बनून बिग बॉसच्या घरात दाखल झाले होते. बिग बॉसच्या घरात असताना राकेश बापट आणि शिल्पा शेट्टीची बहीण आणि बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टी यांच्यात जवळीक वाढत गेली होती.

raqesh bapat shamita shetty
raqesh bapat shamita shetty

बिग बॉसच्या घरात असतानाच राकेशने शमिताला आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे या दोन्ही कंटेस्टंटनी फायनलिस्ट ५ च्या यादीमध्ये आपले नाव नोंदवले होते.बिग बॉसच्या घरात असताना राकेश बापटची पहिली पत्नी रिद्धी डोगरा हिने शमिता आणि राकेशच्या नात्यावर एक प्रतिक्रिया दिली होती की, “हे त्याचं आयुष्य आहे आणि त्याला हवं तसं तो ते जगतो आहे”. राकेश बिग बॉसच्या घरात राहून प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करत आहे. त्याला आरडाओरडा अजिबात आवडत नाही. तो अशाच लोकांशी मैत्री करतो ज्याच्याशी तो कम्फर्टेबल असतो. रिद्धी डोगरा ही उत्कृष्ट डान्सर आणि हिंदी मालिका अभिनेत्री आहे. बॉलिवूड कोरिओग्राफर शामक दावर यांच्या डान्स इन्स्टिट्यूट मधून रिद्धीने नृत्याचे धडे गिरवले होते. सुरुवातीला सह निर्माती म्हणून तिने काम केले होते त्यानंतर ती अभिनय क्षेत्रात आली. २०११ साली राकेश बापटने रिद्धी सोबत लग्न केले होते मात्र २०२० साली त्यांनी घटस्फोट घेतला.

shamita shetty rakesh bapat
shamita shetty rakesh bapat

मर्यादा या हिंदी मालिकेतून एकत्र काम करत असताना दोघांची ओळख झाली होती आणि त्यानंतर या ओळखीचे रूपांतर लग्नात झाले. तुम बिन हा बॉलिवूड चित्रपट आणि काही हिंदी मालिकेतून काम करत असताना राकेशने मराठी चित्रपट साकारले वृंदावन, सविता दामोदर परांजपे ह्या चित्रपटातून तो मुख्य भूमिकेत दिसला होता. बिग बॉसच्या शो नंतर आता राकेश आणि शमिता एकमेकांना वेळ देत असल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या त्यांच्या एका व्हिडिओवर शिल्पा शेट्टीने नुकतीच एक छानशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे राकेश बापट आणि शमिता शेट्टी यांच्या नात्याला आता त्यांच्या कुटुंबियांकडून देखील होकार मिळाला आहे.

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.