नाट्यगृहात एसी चालू नाहीत, पुरेशी स्वच्छता नसते अशा परिस्थितीत देखील कलाकारांना त्यांचे काम करावे लागते. पण नाटकाचे तिकीट काढून आलेली प्रेक्षक मंडळी अशी गैरसोय असेल तर नाटक पाहायला येणार नाहीत. याचा विचार करून वैभव मांगले यांनी आपला संताप सोशल मीडियावर व्यक्त केला होता. त्यावर भारतीय नाट्य परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांत दामले यांनी उत्तर दिलेले पाहायला मिळत आहे. वैभव मांगले यांनी आपल्या तक्रारीत म्हटले होती की, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक येथे प्रयोग झाले संज्या छायाचे. एका हि ठिकाणी वातानुकुलीत यंत्रणा काम करत नव्हती. रंग मंचावर एवढ्या प्रकाशात काम करताना प्रचंड उकाड्यात अतोनात त्रास झाला.
प्रेक्षक डास आणि प्रचंड उकाड्यात, विशेषतः बालगंधर्व पुणे खूप डास आणि उकाडा, कोथरूड यशवंतराव उकाडा मध्ये प्रयोग पहात होते. एक मर्यादेनंतर नाशिक मध्ये रसिकांचा राग, हतबलता अनावर झाली त्यांनी गोंधळ केला. तिकिटाचे पैसे परत घ्यावे का याचा विचार करू लागले. पण आपण Show must Go On वाले लोक. आम्ही विनंती केली की आम्हाला ही त्रास होतोच आहे. इथे येईपर्यंत माहित नव्हतं कि AC नाहीयेय. आमच्या निर्माते दिलीप जाधव यांनी १७ आणि २७ चे शो रद्द केले. त्या हवेचे आवागमन नसलेल्या उकाड्यात प्रयोग पार पडला. कालिदासला तर उत्तर द्यायला ही अधिकारी जागेवर नव्हता. या सगळ्यात सगळ्यांची होलपट होतेय. कुणी कुणी आणि कुठे कुठे कशी दाद मागावी? विचारलं तर सांगतात AC चालू आहे पण खूप गर्मी असल्याने यंत्रणा नीट काम करत नाही.
पावसाळ्यात आणि हिवाळ्यात ही समस्या येत नाही. काय बोलावं या सगळ्यावर? दोन दिवसांपूर्वी झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत प्रशांत दामले यांनी बाजी मारली आहे. या पदाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी वैभव मांगले यांच्या तक्रारीचे निराकरण केले आहे. प्रशांतजी म्हणाले, मी अध्यक्ष नसतानाही या गोष्टींबद्दल बराच सतर्क होतो. अनेक ठिकाणी विविध महापालिकामध्ये आयुक्तांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत होतो. उदय सामंत, शरद पवार हे आमचे ट्रस्टी आहेत. त्यामुळे ते आता अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या माध्यमातून योग्य कामाला मदत करतील याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे पुढच्या सहा महिन्यात कुठल्याही नाट्यगृहाची एसी यंत्रणा बंद पडणार नाही असे आश्वासन प्रशांत दामले यांनी दिलं आहे.