Breaking News
Home / बॉलिवूड / मराठमोळ्या सेलिब्रिटीच्या घरी लवकरच चिमुकल्या पावलांचे आगमन.. हिंदी सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव
rahul vaidya disha parmar
rahul vaidya disha parmar

मराठमोळ्या सेलिब्रिटीच्या घरी लवकरच चिमुकल्या पावलांचे आगमन.. हिंदी सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव

दिशा परमार आणि राहुल वैद्य या सेलिब्रिटींनी लवकरच आई बाबा होणार असल्याची बातमी इन्स्टाग्रामवर जाहीर केली आहे. या जोडप्याने १६ जुलै २०२१ रोजी मुंबईत लग्न केले होते. हिंदी बिग बॉसच्या १४ व्या सिजनमध्ये स्पर्धक असताना गायक राहुल वैद्य याने अभिनेत्री दिशा परमारला जाहीरपणे प्रपोज केले होते. तेव्हापासून हे दोघे लग्न कधी करणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले होते. त्यानंतर काही महिन्यातच मोठ्या थाटात मुंबईत त्यांचे लग्न पार पडले. लग्नानंतर या दोघांनी एका अल्बमसाठी एकत्रित काम केलं. लग्नानंतर जवळपास दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दिशा आणि राहुलने पहिल्या अपत्यासाठी विचार केला आहे.

rahul vaidya disha parmar
rahul vaidya disha parmar

नुकतेच बेबी शॉवरचे फोटो शेअर करत “हॅलो फ्रॉम मम्मी डॅडी टू बी अँड द बेबी!” असे त्यांनी म्हटले आहे. राहुल आणि दिशा दोघेही कॅज्युअल ब्लॅक आउटफिट्समध्ये दिसले. त्यांच्या चाहत्यांनी आणि मित्रांनी त्यांना शुभेच्छा आणि अभिनंदनाचा वर्षाव केला. जस्मिन भसीन, अनिता हसनंदानी, मौनी रॉय, भारती सिंग, अली गोनी, नकुल मेहता या सेलिब्रिटींनी दोघांना शुभेच्छा दिल्या. एका मुलाखतीत राहुलने खुलासा केला होता की, हे दोघे पहिल्यांदा इंस्टाग्राम द्वारे एकमेकांना भेटले होते. त्यावेळी त्याने ‘मेरे रश्के कमर’ हे गाणे गायले होते, जे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दिशाने ते जितेश पिल्लईच्या इंस्टाग्रामवर पाहिले होते आणि त्याच वेळी तीने माझ्या प्रोफाइलवर एक मेसेज टाकला.

rahul vaidya family
rahul vaidya family

मेरे रश्के कमर गाणं आवडल असल्याची दिशा परमार हिने प्रतिक्रिया दिली होती. आणि तेव्हापासून आम्ही इंस्टाग्रामवर एकमेकांशी बोलायला सुरुवात केली असे राहुल सांगतो. या लव्हस्टोरीची सुरुवात अशा प्रकारे झाली आणि पुढे या दोघांनी प्रेम कहाणी या अल्बम मध्ये एकत्रित काम केले. अल्बम मधील प्रेमी युगलांप्रमाणे दोघांचे लिपलॉक पोस्टर खूपच चर्चेत राहिले होते. राहुलने गायलेल्या एका गाण्यासाठी दिशाने अभिनेत्री म्हणून काम केले होते. इंडियन आयडल नंतर राहुल लाईव्ह कार्यक्रमाद्वारे आजही रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत आहे. नॉटी बलम, जिंदगी, गरबे की रात, मेहंदी बरेच अल्बम फेमस आहेत. गायनाच्या त्याच्या या टॅलेन्टमुळे राहुल वैद्य नेहमी प्रकाश झोतात राहिला आहे.

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.