प्राजक्ता माळीची गुरू रवी शंकर यांच्यावर खूप श्रद्धा आहे. काही दिवसांपूर्वी आर्ट ऑफ फाउंडेशन अंतर्गत तिने गुरूपूजा पंडित हा कोर्स पूर्ण केला होता. अध्यात्मचा मार्ग स्वीकारलेल्या प्राजक्ताने गेल्या काही दिवसांपासून अनेकदा श्री रविशंकर यांच्या आश्रमाला जाऊन भेट दिली आहे. त्यामुळे प्राजक्ताने संन्यास घेतला का अशी चर्चा पाहायला मिळाली होती. या चर्चेवर मी अजून संन्यास घेतलेला नाही असे स्पष्टीकरण प्राजक्ताने दिले होते. त्यानंतर या चर्चेला पूर्णविराम देण्यात आला होता. प्राजक्ताने श्री रविशंकर यांना याच संदर्भात एक प्रश्न विचारला होता की, लग्न करणं कंपल्सरी आहे का? श्री रविशंकर यांनी प्राजक्ताला यावर योग्य प्रकारे उत्तर देऊन तिचे समाधान केले होते.
आता नुकतीच प्राजक्ता श्री रविशंकर यांच्या आश्रमात गेली आहे. यावेळीही तिला श्री रविशंकर यांना प्रश्न विचारण्याची संधी मिळाली. तेव्हा प्राजक्ताने कलाकारांच्या भावविश्वावर एक प्रश्न विचारला. कलाकारांचं आयुष्य हे खूप गुंतागुंतीच असतं. आर्थिक, भावनिक, सामाजिक दृष्ट्या या सगळ्यांकडे त्यांना लक्ष द्यावं लागतं कलाकार हे नेहमी आपल्या भावभावना चेहऱ्यावरून दाखवत असतात पण ते स्वतःचे दुःख लपवून ठेवतात. कित्येक कलाकारांच्या बाबतीत हे घडलेलं आहे. चेहऱ्यावरचे भाव लपवून ठेवणे हे त्यांना अगदी योग्य जमतं. त्यांना कुटुंब असतं पण आयुष्यभर पैशाच्या मागे धावत असतात त्यांनी हे दुःख लपवावं का किंवा यावर त्यांचा भाव नेमका कसा असायला हवा? असा प्रश्न प्राजक्ताने विचारला असता श्री रवीशंकर यावर म्हणतात की, कलाकारांचं आयुष्य हे सार्वजनिक असतं.
त्यांना लोकांमध्ये जावं लागतं म्हणून ते आपल्या भावभावना लपवून ठेवतात. त्यांना अभिनयाचे नऊरस दाखवावे लागतात. आनंद, विरह, दुःख, शौर्य अशा भावना त्यांना व्यक्त कराव्या लागतात. पण या सर्वातून त्यांनी भावादीत व्हायला हवं ज्याने तुम्हाला आत्मबळ मिळू शकतं. त्यातूनच स्थिरता मिळायला हवी. अमेरिकेतला मायकल जॅक्सन असो किंवा लता मंगेशकर असो, एका मुलाखतीत लता मंगेशकर म्हणाल्या होत्या की मी पुन्हा लता बनून जन्माला याव अशी माझी ईच्छा नाही. कारण त्यांनी ते दुःख अनुभवलं होतं. हेच दुःख विसरण्यासाठी कलाकारांनी योग चा मार्ग निवडायला हवा. योग म्हणजे केवळ व्यायाम नाही तर तो येणारे दुःख दूर कसे करायचे हे शिकवण्याचे काम करतो. जर कोणी कलाकार अध्यात्मिक गोष्टीकडे वळला तर तो खरोखरच सुखी होतो. कलाकारांनीही प्रत्येक गोष्ट कवटाळून बसण्यापेक्षा दुःखी राहण्यापेक्षा ती सोडून देण्याची कला अवलंबली पाहिजे. तरच तो आयुष्यात सुखी होईल.