काही दिवसांपूर्वी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिची एक मुलाखत खूप व्हायरल झाली होती. या मालिकेत तिने तिच्या क्रशबद्दल एक मोठा खुलासा केला होता. कॉफी आणि बरंच काही या चित्रपटानंतर प्राजक्ताला वैभव तत्ववादी आवडू लागला. दरम्यान प्राजक्ता हळूहळू मराठी मालिका सृष्टीत आपली ओळख वाढवत होती. याच दरम्यान तिने वैभव तत्ववादीला समोर ठेवून आईकडे लग्नाचा प्रस्ताव मांडला. आई तुला हा चालेल का जावई म्हणून असे म्हणत तिने आईकडे वैभव सोबत लग्न करण्याची उत्सुकता दाखवली. अर्थात हा तिच्या आयुष्यातला एक गमतीचा भाग ठरला.
मात्र तिची ही मुलाखत व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या चाहटत्यांनी एकमेकांसोबत लग्न कधी करताय असा तगादा लावला. दोघांनाही त्यांच्या चाहत्यांकडून अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. शुक्रवारी ७ एप्रिल रोजी वैभव तत्ववादी आणि हृता दुर्गुळे यांचा सर्किट हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या निमित्ताने हृता आणि वैभव मुलाखतीत एकमेकांबद्दल भरभरून बोलले. यातच वैभवला प्राजक्ता माळीच्या लग्नाच्या प्रस्तावा बाबत विचारले. तेव्हा वैभवने त्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, प्राजक्ता माळी माझी खूप चांगली मैत्रीण आहे. तिने दिलेल्या मुलाखतीचा हा व्हडिओ मला सेंड केला होता. त्यात ती आईला म्हणाली की हा मुलगा जावई म्हणून चालेल का? पण तसं मुळात काहीच घडलं नाही.
तिच्या आईने माझ्याकडे लग्नाचा प्रस्ताव आणला आणि तिने देखील याबद्दल माझ्याशी काही बोलले नाही. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी खूप गमतीशीर आहेत. लोकं आम्हाला लग्न कधी करणार याबद्दल अजुनही विचारतात की नाहीत जे मला माहित नाही. पण तसं मात्र आमच्यात काहीच नाही. प्राजक्ता माली माझी फक्त एक चांगली मैत्रीण आहे बस एवढंच. असे म्हणत वैभव पुढच्या प्रश्नाकडे वळतो. त्यामुळे प्राजक्ता माळी वैभव तत्ववादी सोबत लग्न करणार का या प्रश्नाचे उत्तर आता चाहत्यांना मिळालेले आहे. तूर्तास प्राजक्ता माळी अजूनही सिंगल असल्याचे म्हणते. तर वैभव तत्ववादी अनेकदा पूजा सावंत सोबत दिसत असल्याने दोघेही एकमेकांना डेट करत आहेत का अशी चर्चा सुरू आहे.