Breaking News
pornima tejaswini pandit
pornima tejaswini pandit
Home / जरा हटके / तेजस्विनी पंडितची सख्खी बहीण आहे तिच्यासारखीच सेम टू सेम

तेजस्विनी पंडितची सख्खी बहीण आहे तिच्यासारखीच सेम टू सेम

अग्गबाई अरेच्चा चित्रपटातून खलनायिकेची भूमिका साकारून अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने मराठी चित्रपट सृष्टीत पहिले पाऊल टाकले होते. पदर्पणात विरोधी भूमिका साकारणारी ही अभिनेत्री ये रे ये रे पैसा, देवा, एक तारा,7 रोशन व्हीला, तू ही रे, मी सिंधुताई सपकाळ, गैर राणभूल यासारख्या चित्रपटासोबतच १०० डेज या मालिकेतूनही ती प्रेक्षकांसमोर आली. अभिनयाचे बाळकडू तिला तिच्या आईकडूनच मिळाले आहे. मराठी नाट्य तसेच चित्रपट अभिनेत्री ज्योती चांदेकर पंडित या तेजस्विनीच्या आई. सध्या सोनी मराठीवरील तू सौभाग्यवती हो मालिकेत त्या महत्वाची भूमिका साकारत आहेत. मी सिंधुताई सपकाळ या चित्रपटातून या दोघी माय लेकीने सिंधुताईंची भूमिका साकारलेली पाहायला मिळाली होती.

तेजस्विनीला एक सख्खी बहीण देखील आहे परंतु मिडियासमोर ती फारशी कधी दिसलीच नाही. या कारणाने सोशल मीडियावरही तिचे फोटो फारसे पाहायला मिळत नाहीत. क्वचित प्रसंगीच तेजस्वीनीसोबत तिला तिच्या इन्स्टाग्रामवर पाहिले गेले आहे. तिच्या या बहिणीचे नाव आहे “पूर्णिमा पंडित पुल्लन”.

Tejaswini pandit sister
Tejaswini pandit sister

पूर्णिमा ही तेजस्विनीची थोरली बहीण आहे टेक्सासमध्ये ऑस्टिन शहरात ती वास्तव्यास होती. परंतु काही वर्षापूर्वीच ती भारतात परतली असून आपल्या कुटुंबासोबत पुणे शहरात स्थायिक झाली आहे. तेजस्विनी आणि अभिज्ञा भावे यांच्या ‘तेजाज्ञा’ या ब्रॅंडशीही ती निगडित असून बहुतेकदा या ब्रॅण्डसाठी स्पेशल असिस्टंट म्हणून तिने काम सांभाळले आहे. याशिवाय पूर्णिमाला कुकींगची देखील विशेष आवड आहे. तिच्या इन्स्टाग्राम वरून ती नेहमीच स्वतः बनवलेल्या वेगवेगळ्या पदार्थांचे फोटो शेअर करत असते.

तेजस्विनी आणि पूर्णिमा या दोघी बहिणींच्या दिसण्यात देखील तुम्हाला खूपच साम्य दिसून येईल. अर्थात मराठी सृष्टीत असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांचे बहीण भाऊ दिसायला अगदीच त्यांच्यासारखेच सेम दिसतात. त्यात गौतमी देशपांडे आणि मृण्मयी देशपांडे यांचेही नाव आवर्जून घ्यावे लागेल. गौतमी आणि मृण्मयी दोघी बहिणी टीव्ही मालिका, चित्रपट या माध्यमातून नेहमीच प्रेक्षकांसमोर येतात परंतू पूर्णिमा या क्षेत्रापासून काहीशी दूरच असलेली पाहायला मिळते याच कारणामुळे ती प्रकाशझोतात फारशी कधी आलीच नाही.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.