Breaking News
divya subhash
divya subhash
Home / मराठी तडका / मुलगी झाली हो मालिकेतील माऊची रिअल लाईफ स्टोरी…

मुलगी झाली हो मालिकेतील माऊची रिअल लाईफ स्टोरी…

स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो मालिकेने नुकताच २०० भागांचा टप्पा पार केला आहे. सध्याच्या घडीला ही मालिका गोव्यामध्ये शूट केली जात होती मात्र आता गोवा सरकारच्या निर्बंधनामुळे मालिकेचे शूटिंग रद्द करण्यात आले आहे. मालिकेच्या सेटवर महा मारीचा शिरकाव देखील झाला असल्याने विलास आणि माऊचे पात्र साकारणारे कलाकार त्याच्या विळख्यात सापडले आहेत. माऊ आणि विलास ही पात्र प्रेक्षकांनी आपलीशी केली असून त्यांच्या आरोग्याची काळजी प्रेक्षकांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. मालिकेचे शूट सध्या बंद असले तरी लवकरच गुजरातमध्ये याचा सेट हलवण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मालिकेच्या चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बातमी ठरत आहे. तुर्तास मालिकेतील प्रमुख पात्र माऊ हिची रिअल लाईफ स्टोरी जाणून घेऊयात…

मालिकेत माऊचे पात्र साकारले आहे “दिव्या सुभाष पुगावकर” हिने. मालिकेत विलासने तिचे नाव साजिरी ठेवले आहे. मूळची माणगावची असलेल्या दिव्याने २०१९ सालच्या श्रावण क्वीन या सौंदर्य स्पर्धेत सहभाग दर्शवून मिस टॅलेंटेडचा मान पटकावला होता. मॉडेलिंगची आवड असलेल्या दिव्याने २०१७ साली मुंबईची सुकन्या स्पर्धेत मोस्ट पॉप्युलर फेसचे मानांकन प्राप्त केले होते.

दिव्या माणगावची असली तरीही तिचे संपूर्ण शिक्षण मात्र मुंबईतच पूर्ण झाले आहे. दिव्याने मुलगी झाली हो या मालिकेअगोदर प्रेमा तुझा रंग कसा आणि विठुमाऊली या मालिकेतून छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. मुलगी झाली हो या मालिकेतून तिला पहिल्यांदा ‘माऊची’ प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. दिव्या तिच्या इन्स्टाग्रामवर चांगलीच ऍक्टिव्ह आहे अभिनय आणि मॉडेलिंग यांच्यासोबत दिव्याला डान्सची देखील प्रचंड आवड आहे. तिने साकारलेल्या माऊच्या पात्रावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले आहे त्याचमुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका ठरली आहे. दिव्याला तिच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा…

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.