Breaking News
Home / जरा हटके / गेल्या काही दिवसांपासून तक्रारी वाढत चालल्या होत्या.. म्हणून मी चला हवा येऊ द्या मधून बाहेर पडलो
nilesh sable chala hawa yeu dya
nilesh sable chala hawa yeu dya

गेल्या काही दिवसांपासून तक्रारी वाढत चालल्या होत्या.. म्हणून मी चला हवा येऊ द्या मधून बाहेर पडलो

गेल्या काही दिवसांपासून झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या शोला प्रेक्षकांकडून खूप कमी प्रतिसाद मिळू लागला आहे. अशातच हा शो बंद होणार असल्याची चिन्ह देखील दिसून आली होती. पण अजूनही झी मराठीवर तग धरून असलेला हा शो प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. अशातच आता शोचा प्रमुख निलेश साबळे यानेच शो मधून काढता पाय घेतला आहे. आरोग्याच्या तक्रारी वाढत चालल्यामुळे मी शो मधून काही दिवसांसाठी बाहेर पडतोय असे निलेश साबळे म्हणाला होता. मात्र यामागचे खरे कारण नुकतेच समोर आलेले आहे.

shreya bugade chala hawa yeu dya
shreya bugade chala hawa yeu dya

चला हवा येऊ द्या शो ने गेली ८९ वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. शोला कमी प्रतिसाद मिळू लागल्याने झी मराठीने निलेश साबळेला शो थांबवण्यासाठी बोलणी केली होती. पण त्यानंतर झी मराठीने कसाबसा हा शो चालू ठेवलेला पाहायला मिळाला. मात्र आता या शोमध्ये अनेक बदल घडून आलेले प्रेक्षकांच्याही लक्षात आले. कुशल बद्रिके लवकरच एका हिंदी कॉमेडी शोचा भाग बनणार आहे. तर निलेश साबळे यानेही काढता पाय घेत सूत्रसंचालनाची जबाबदारी श्रेया बुगडेवर सोपवली आहे. पण आता चला हवा येऊ द्या चे महत्वाचे चेहरेच शोमध्ये नसल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे निलेश साबळेने शोमधून बाहेर पडण्याचे नेमके कारण काय हे सांगितले आहे. चला हवा येऊ द्या हा शो गेले अनेक वर्षे तुमचे मनोरंजन करत आहे.

nilesh sable
nilesh sable

मी या कार्यक्रमाचा भाग होतो याचा मला अभिमान आहे. पण आता या कार्यक्रमात मी नसणार आहे, काही दिवसांपूर्वीच मी या कार्यक्रमातून बाहेर पडलो आहे. मी माझ्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्याचे सांगितले होते. याच जोडीला माझ्या एका वेबसिरीजचं आणि एका चित्रपटाचंही काम सुरू आहे. या सगळ्यातून वेळ ऍडजस्ट करता येत नव्हता. या व्यस्त कामामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढत चालल्या होत्या. स्वतःची तब्येत सांभाळून मला काम करायचं होतं म्हणून मी चला हवा ठेऊ द्या मधून बाहेर पडलो आहे. कदाचित चार पाच महिन्याने मी पुन्हा या कार्यक्रचा भाग असेन असा एक विश्वासही निलेश साबळे यांनी यावेळी चाहत्यांना दिला आहे.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.