Breaking News
Home / बॉलिवूड / बॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेते अमरीश पुरी यांचे कुंटुब राहते इंडस्ट्रीपासून दूर , पण त्यांची मुलगी दिसते एवढी सुंदर की अभिनेत्री पडतील फिक्या…
namrata amrish puri daughter
namrata amrish puri daughter

बॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेते अमरीश पुरी यांचे कुंटुब राहते इंडस्ट्रीपासून दूर , पण त्यांची मुलगी दिसते एवढी सुंदर की अभिनेत्री पडतील फिक्या…

मित्रहो अभिनय क्षेत्रातील प्रसिद्ध विलन म्हणून ओळखले जाणारे अमरीश पुरी यांनी या क्षेत्रात एक विशेष नावीन्य मिळवले आहे. त्यांचे नाव निघताच भूमिकेतील अनेक पात्रे जी त्यांनी अजरामर केली आहेत ती सहज आठवतात. त्यांनी या फिल्म इंडस्ट्री ला अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत ज्या चित्रपटांनी पडद्यावर चांगलीच कमाई केली होती. चित्रपट सृष्टीतील ते एक असे कलाकार होते ज्यांना कोणतेही पात्र दिले तरी ते उत्तम जमत होते. प्रत्येक वेळी त्यांनी रसिकांना आपला एक नवा चेहरा दाखवला आहे. कधी वडील म्हणून तर कधी शत्रू बनून. जरी त्यांनी पूर्ण कारकीर्द मध्ये जास्तीत जास्त नकारात्मक भूमिका साकारली असली तरीही रसिक मात्र त्यांचे खूपच दिवाने झाले. एक अभिनेत्री सुद्धा आपल्या सौंदर्याने इतके चाहते मिळवत नाही जेवढे त्यांनी आपल्या फक्त बोलण्याच्या आणि भयानक हास्याच्या आधारे मिळवले.

namrata puri amrish puri daughter
namrata puri amrish puri daughter

कलेची आवड तर त्यांना नेहमीच होती , सुरुवातीला ते एका सरकारी विमा कंपनी मध्ये कामाला होते . पण तिथेही त्यांना त्यांची कला स्वस्थ बसू देत न्हवती म्हणून त्यांनी पृथ्वी थेटर मध्ये सहभाग घेतला आणि मग तिथून अभिनयाची सुरुवात केली. हळूहळू त्यांना एका पेक्षा एक चित्रपट मिळत गेले अगदी प्रत्येक चित्रपटात त्यांची भूमिका असायचीच. त्यांच्याशिवाय तो चित्रपट अपुरा वाटायचा. त्यांनी जवळपास 450 चित्रपटात काम केले आहे. एवढी कलेची आवड असणारे अमरीश पुरी हे त्यांच्या कुटुंबात एकटेच असे उत्कृष्ट कलाकार होते. त्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी आणि दोन मुले आहेत. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. अमरीश पुरी यांची मुलगी लहानपणापासूनच खूपच सुंदर दिसते आणि आता ती खूप मोठी झाली आहे. तीचे सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो पाहून तुम्हीही चकित व्हाल . ती दिसायला खूप सुंदर आहे. तीचे नाव नम्रता असे आहे. नम्रताचे ग्रॅज्युएशन पूर्ण होऊन तीने एनजनियरिंग ची डिग्री घेतली आहे. नम्रता ही नावाप्रमाणेच नम्र आहे. ती आधीपासूनच खूप शांत आहे त्यामुळे या चित्रपटसृष्टीत, धावपळीच्या दुनियेत तीने आजवर कधीच प्रवेश केला नाही. पण सोशल मीडियावर असणाऱ्या तीच्या चाहत्यांना नेहमी असे वाटते की तीने देखील या चंदेरी दुनियेत पाऊल ठेवावे.

amrish puri daughter namrata puri
amrish puri daughter namrata puri

नम्रता ही खूप हुशार आहे, ती दिसायलाही खूप सुंदर आहे . एका अभिनेत्री चे सारे गुण तिच्यामध्ये आहेत पण तरीही या क्षेत्रात तीला यायचे नाही . त्यांच्या परिवारातील फक्त अमरीश पुरी असे होते ज्यांनी या क्षेत्रात पाऊल ठेवले आणि अमर झाले. त्यांनी आपल्या वेगवेगळ्या छटा प्रत्येक चित्रपटात उमटवल्या आहेत. त्यामुळे आता पूर्ण जग त्यांना ओळखते. त्यांच्या अभिनयाला लोक मनापासून पसंत करतात. त्यांचा राखट चेहरा जरी भीती घालत असला तरीही त्यांचा अभिनय मात्र हृदय जिंकून जातो.अमरीश पुरी यांची कन्या नम्रता हीने स्वतःसाठी जे क्षेत्र निवडले असेल ते कदाचित तिच्यासाठी योग्य असेलच, शेवटी या क्षेत्रात येण्यासाठी आवड महत्वाची असतेच. त्यामुळे तिच्या आयुष्यातील प्रत्येक प्रयत्नाला आमच्या कडून भरपूर शुभेच्छा. तीने खूप प्रगती करून आपल्या कुटुंबाचे नाव झळकवावे ही सदिच्छा. तर मित्रहो तुम्हाला हा लेख कसा वाटला ते नक्कीच सांगा तसेच लाईक

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.