Breaking News
Home / मराठी तडका / छोट्या मायराची मोठ्या पडद्यावर एन्ट्री.. या चित्रपटातून साकारणार महत्वपूर्ण भूमिका
myra vaikul nach ga ghuma
myra vaikul nach ga ghuma

छोट्या मायराची मोठ्या पडद्यावर एन्ट्री.. या चित्रपटातून साकारणार महत्वपूर्ण भूमिका

झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेने आजही  प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण करून ठेवलं आहे. श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे ही फ्रेश जोडी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. सोबतच मालिकेतील चिमुरड्या परीनेही निरागस अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले होते. ही भूमिका मायरा वायकुळ हिने साकारलेली पाहायला मिळाली होती. या मालिकेने मायरा प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली होती. पण आता हीच मायरा मोठ्या पडद्यावर सुद्धा पदार्पण करण्यासाठी सज्ज झालेली आहे. परेश मोकाशी दिग्दर्शित नाच गं घुमा या चित्रपटातून मायरा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

namrata sambherao mukta barve supriya pathare
namrata sambherao mukta barve supriya pathare

मायराला यात महत्वाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. नाच गं घुमा या चित्रपटाचे लेखन मधूगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी यांनी केले आहे. एका स्त्रीला घरासंसार सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते. तिच्या या मेहनतीमागे मोलकरीणीचा हात असतो. जेव्हा मालकीण आणि मोलकरीण बाईंचे सूर जुळतात तेव्हा नाच गं घुमाचा आविष्कार होतो. याच आशयाला अनुसरून मोकाशी यांनी समस्त स्त्रीवर्गासाठी हा चित्रपट बनवला आहे. या चित्रपटात मुक्ता बर्वे, सुप्रिया पाठारे, नम्रता संभेराव, सुकन्या कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत, आशा ज्ञाते यांच्यासह मायरा वायकुळ अशी भली मोठी स्टार कास्ट तुम्हाला पाहायला मीळणार आहे. मायरा वायकुळ हिने याअगोदर एका हिंदी चित्रपटासाठी काम केले होते.

myra vaikul world of myra
myra vaikul world of myra

मात्र तो चित्रपट अजूनही काही कारणास्तव रखडला आहे. पण त्यानंतर सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या मायराला झी मराठीची ऑफर मिळाली आणि परी बनून ती प्रेक्षकांची पसंती मिळवू लागली. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेनंतर मायराला नीरजा या हिंदी मालिकेत देखील मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. नाच गं घुमा हा चित्रपट मे महिन्यात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे मायराचा हा पहिलाच मराठी चित्रपट असल्याने ती या पहिल्या वहिल्या चित्रपटाच्या पदार्पणासाठी खूपच उत्सुक आहे. मायराला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार असल्याने चाहत्यांनीही हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुकता दर्शवली आहे. एवढ्या कमी वयात मालिका, चित्रपट असा मायराचा यशस्वी प्रवास सुरु आहे. तिच्या या यशस्वी घोडदौडीमागे तिच्या आईबाबांचाही मोठा हातभार आहे. या पहिल्या वहिल्या चित्रपटासाठी मायरा वायकुळ हिचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील प्रवासासाठी शुभेच्छा.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.