Breaking News
Home / मालिका / मुक्ता बर्वे झळकणार या नव्या मालिकेत… प्रेक्षक झाले आतुर
mukta barve new tv serial on sony marathi
mukta barve new tv serial on sony marathi

मुक्ता बर्वे झळकणार या नव्या मालिकेत… प्रेक्षक झाले आतुर

त्याच त्याच मालिका आणि तेच तेच पाणी वाढवून प्रेक्षकांच्या माथी मारलेले कथानक या सर्वाचा आता चोखंदळ प्रेक्षकांना कंटाळा आला आहे. प्रत्येक मालिकेत दोन तीन लफडी असल्याशिवाय कुठलीच मालिका पूर्ण होत नाही असेच काहीसे चित्र सध्या मालिकांमधून दिसत आहे. मात्र आता मराठी सृष्टीतील चोखंदळ आणि तितकीच अभ्यासू अभिनेत्री लवकरच नव्या नालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.. ही अभिनेत्री आहे आपल्या सर्वांची लाडकी मुक्ता बर्वे.

आभाळमाया, श्रीयुत गंगाधर टिपरे, घडलंय बिघडलंय, एका लग्नाची दुसरी गोष्ट, अग्निहोत्र या आणि अशा अनेक दर्जेदार मालिकांमधून ती नेहमीच प्रेक्षकांसमोर आली आहे. आपल्या कारकिर्दीत तिने अतिशय चोखंदळपणे निवडलेल्या आणि तितक्याच दर्जेदार असलेल्या भूमिकानाच नेहमी प्राधान्य दिले आहे. त्यामुळे ती एक अभ्यासू अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. याच अनुषंगाने मुक्ताने एक मालिका स्वीकारली आहे. ३५ व्या वर्षी आपले लग्न ठरावे यासाठी मीरा वधू वर सूचक मंडळात आपले नाव नोंदवायला जाते तिथेच तिचा जुना मित्र आदित्य तिला भेटतो. असे हे कथानक असलेली नवी मालिका “अजूनही बरसात आहे” सोनी मराठी वाहिनीवर १२ जुलै रोजी दाखल होणार आहे. या मालिकेत मुक्ता बर्वे मिराची भूमिका साकारत आहे तर उमेश कामत या मालिकेतून आदित्यची भूमिका साकारणार आहे.

umesh kamat mukta barve ajunhi barsaat aahe
umesh kamat mukta barve ajunhi barsaat aahe

मोठ्या पडद्यावरचे हे मोठे कलाकार छोट्या पडद्द्यावरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने प्रेक्षक खूपच आनंदित झाले आहेत. शिवाय या मालिकेच्या माध्यमातून एक वेगळी गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ही मालिका पाहण्यासाठी प्रेक्षक आतापासूनच उत्सुक असलेली पाहायला मिळतात याचे कारण म्हणजे मुक्ता बर्वे आणि उमेश कामत. या दोघांना मालिकेतून एकत्रित पाहायला प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच सोनी वाहिनीने प्रेक्षकांसमोर आणला होता. हा प्रोमो पाहून चाहत्यांनी आपला आनंद व्यक्त करून भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत यावरूनच ही मालिका आतापासूनच हिट ठरणार आहे अशी खात्री मिळाली आहे. मुक्ता बर्वे आणि उमेश कामत यांची जोडी पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर एकत्रित पाहायला मिळणार आहे. दोघांमधील केमिस्ट्री नेमकी कशी जुळून येते हे मालिका पाहिल्यावरच समजेल. त्यासाठी प्रेक्षकांना १२ जुलै पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

ajunahi barsat aahe mukta barve umesh kamat
ajunahi barsat aahe mukta barve umesh kamat

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.