Breaking News
Home / मालिका / देवमाणूस मालिकेत मनमोहक आर्या देशमुखची एन्ट्री..

देवमाणूस मालिकेत मनमोहक आर्या देशमुखची एन्ट्री..

झी मराठी वरील देवमाणूस या मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सध्या टीआरपीच्या बाबतीतही ही मालिका पुढे असल्याचे दिसून येते. म्हणूनच गेल्या काही दिवसांपासून मालिका बंद होणार असल्याच्या चर्चा जोर धरताना दिसल्या मात्र डॉक्टर या संकटातून कसा निसटतो हे आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मालिकेत डॉक्टर विरोधात पुरावे मिळाल्याने दिव्याने डॉक्टरला अटक केली आहे त्याची ही केस आता कोर्टात गेली असल्याने या मालिकेत एक नवा ट्विस्ट आलेला दिसून येत आहे.

या ट्विस्टमध्ये एका अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. आर्या देशमुख हे पात्र आपल्याला मालिकेत पाहायला मिळणार आहे. आर्या देशमुख वकील असून ती डॉक्टरच्या विरोधात केस लढणार आहे मात्र कोर्टात ती डॉक्टरविरोधात सर्व पुरावे दाखल करू शकेल का किंवा आणखी काही वेगळे पाहायला मिळणार हे येत्या काही भागातच स्पष्ट होईल. आज मालिकेत आर्या देशमुखची भूमिका कोण साकारत आहे त्याबद्दल जाणून घेऊयात. अभिनेत्री “सोनाली पाटील” ही देवमाणूस मालिकेतून आर्या देशमुखचे पात्र साकारत आहे. सोनाली पाटील टिक टॉक स्टार म्हणून ओळखली जाते. आपल्या एक्सप्रेशन्सने तिने व्हिडिओतून चाहत्यांची मने जिंकून घेतली होती. त्यामुळे सोशल मीडियावर तिचा चांगलाच फॅन फॉलोअर्स पाहायला मिळतो. सोनालीने सोनी मराठी वाहिनीवरील जुळता जुळता जुळतंय की या मालिकेतून भूमिका साकारली होती. तर स्टार प्रवाहवरील “वैजू नं. १” या मालिकेतून तिने प्रमुख भूमिका बजावली होती.

vakil aarya deshmukh devmanus
vakil aarya deshmukh devmanus

मालिकेत तिने साकारलेली बिनधास्त वैजू प्रेक्षकांची मने जिंकून गेली होती. खरं तर ही मालिका तिला टिक टॉकच्या व्हिडीओ मुळेच मिळाली होती. सोनाली शिक्षिका असून तीन वर्षे तिने कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून नोकरी केली आहे एक छंद म्हणून कोल्हापूरमध्ये असताना टिक टॉक चे व्हिडीओ ती बनवू लागली यातच तिला अमाप प्रसिद्धी मिळू लागली. मालिकांमधून छोट्या छोट्या भुमिका साकारणारी सोनाली वैजू नं १ मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकली. आता ती पुन्हा एकदा देवमाणूस मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आपल्याला आयुष्यात झी
मराठीचा प्लॅटफॉर्म मिळावा अशी सर्वच कलाकाराची मनोमन ईच्छा असते. या मालिकेतून सोनालीची देखील ही ईच्छा पूर्ण होणार आहे. मालिकेत आर्याची एन्ट्री झाली आहे, हे पात्र दमदार असले तरी डॉक्टर तिला आपल्या जाळ्यात खेचणार की आणखी काही वेगळ्या घडामोडी घडणार हे पाहणे आता रंजक होणार आहे.

lawyer aarya deshmukh devmanus
lawyer aarya deshmukh devmanus

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.