Breaking News
Home / मराठी तडका / हळद लागली.. मॉनिटर आणि मोदकच्या लग्नाअगोदरच्या विधींना झाली सुरुवात
mugdha vaishampayan wedding ceremony
mugdha vaishampayan wedding ceremony

हळद लागली.. मॉनिटर आणि मोदकच्या लग्नाअगोदरच्या विधींना झाली सुरुवात

गेल्या अनेक दिवसांपासून  गायिका मुग्धा वैशंपायण आणि गायक प्रथमेश लघाटे यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. गेल्याच महिन्यात या दोघांनी अतिशय साधेपणाने साखरपुडा केलेला पाहायला मिळाला. त्यानंतर डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच मुग्धाची बहीण मृदुल हिने विश्वजित जोगळेकर सोबत मोठ्या थाटात लग्नगाठ बांधलेली पाहायला मिळाली. मात्र सारेगमपमधून लोकप्रियता मिळवलेले मॉनिटर आणि मोदक हे दोघे लग्न कधी करतायेत याचीच जास्त विचारणा होऊ लागली. पण आता त्यांच्या चाहत्यांची ही प्रतीक्षा संपलेली पाहायला मिळत आहे.

prathamesh laghate mugdha vaishampayan
prathamesh laghate mugdha vaishampayan

कारण मुग्धा आणि प्रथमेशच्या लग्नाची घटिका समीप आलेली आहे. आज या दोघांचाही हळदीचा सोहळा पार पडलेला आहे. प्रथमेश आणि मुग्धा यांनी एकत्रितपणे हळदीचा सोहळा साजरा न करता आपापल्या घरी हा सोहळा साजरा केला आहे. हळदीचे काही खास क्षण या दोघांनीही सोशल मीडियावर शेअर केलेले आहेत. त्यामुळे वैशंपायण कुटुंबात पुन्हा पंधरा दिवसांनी सनई चौघड्यांचा आवज दुमदुमू लागला आहे. दोन दिवसांपूर्वी प्रथमेशच्या घरी व्याही भोजनाची व्यवस्था करण्यात आली यावेळी वैशंपायण कुटुंबाने प्रथमेशच्या घरी हजेरी लावली होती.

mugdha vaishampayan wedding
mugdha vaishampayan wedding

त्यात मुग्धाची बहीण मृदुल आणि विश्वजित या नवविवाहित दाम्पत्याला देखील आमंत्रित करण्यात आले होते. व्याही भोजनाचा हा सोहळा पाहून ही संस्कृती जपल्याने अनेकांनी दोघांच्याही कुटुंबियांचे कौतुक केले आहे. दरम्यान लग्नागोदर मुग्धा आणि प्रथमेशवर हरिद्रा लापन हा संस्कार करण्यात आला त्यानंतर त्यांच्या हळदीचा सोहळा पडला. दरम्यान आता या दोघांच्याही लग्नाच्या सोहळ्यात कोणकोणते कलाकार हजेरी लावणार याची जास्त उत्सुकता आहे. सारेगमप मधील मॉनिटर आणि मोदक लवकरच विवाहबंधनात अडकत असल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या नवीन वाटचालीसाठी त्यांना चाहत्यांकडून शुभेच्छा देखील मिळू लागल्या आहेत.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.