Breaking News
Home / जरा हटके / मिलिंद सोमणचे २७ वर्षांनी लहान अंकिता सोबत लग्न कसे झाले?.. एक खरी प्रेमकथा
milind soman weds ankita konwar
milind soman weds ankita konwar

मिलिंद सोमणचे २७ वर्षांनी लहान अंकिता सोबत लग्न कसे झाले?.. एक खरी प्रेमकथा

मिलिंद सोमणने त्याच्यापेक्षा २७ वर्षांनी लहान असलेल्या अंकिता बरोबर लग्न केले हा चाहत्यांसाठी नेहमी चर्चेचा विषय राहिला आहे, कारण बॉलिवूड मध्ये असे प्रसिद्ध जोडपे शोधून सापडणार नाही. आज आपण याच गोष्टीचे गुपित जाणून घेणार आहोत. मिलिंद आणि अंकिता या दोघांमधील वयाचे अंतर भरपूर असले तरी लग्नाअगोदर जवळजवळ ४ वर्षांपासून ते लपून डेटिंग करत होते. हे असं ऐकून तुमच्या भुवया नक्कीच उंचावल्या असतीलच.. अंकिता कोण आहे, ती काय करते आणि हे दोघे एकमेकांच्या आयुष्यात कसे आले हे सर्व रंजक असून आपल्याला पुढे समजणार आहे..

मिलिंद सोमण साधारण ५० वर्षांचा असेल, त्याची शरीर यष्टी सुडोल व मनमोहक होती. या वर्षी त्याने भारताचे पुरुष सुपरमॉडेल आणि युरोपमध्ये झालेली आयर्नमॅन रेस जिंकली होती. सोमण अनेकदा इतर प्रेमसंबंधामुळेही चर्चेला विषय होता, ज्यात प्रामुख्याने शहाना गोस्वामी, दीपनीता शर्मा यांसारख्या सुंदर नावांचा समावेश होता. प्रेमाला वयाचे बंधन असते का? एका नियतकालिकेशी संवाद साधताना हवाई सुंदरी असलेल्या अंकिताने स्वत: मिलिंद सोमणला पहिल्यांदा भेटल्याच्या वेळेबद्दल सांगितले होते, “मी माझ्या सहकाऱ्यांसमवेत मलेशियातील एका हॉटेलमध्ये राहत होते. एकदा लॉबीमध्ये मला एक उंच, सुडोल माणूस दिसला. तो मिलिंद सोमण होता! मी खूप मोठी चाहती होते! म्हणून मी हॅलो म्हणायला गेले होते, पण तो व्यस्त होता. आमचे काहीच संभाषण झाले नाही.” “काही दिवसांनी मी त्याला पुन्हा हॉटेलच्या नाईट क्लबमध्ये पाहिलं. मी त्याच्याकडे बघतच राहिले आणि तो माझ्याकडेही बघत होता! माझ्या मित्रांनी मला त्याच्याशी बोलण्याची विनंती केली. म्हणून मी विचारले की त्याला नाचायला आवडेल का आणि त्याने होकार दिला! तेव्हा एक वेगळेच वातावरण तयार झाले होते – मला ते जाणवत होतं!” ती म्हणाली.

milind soman and ankita milind konwar photos
milind soman and ankita milind konwar photos

त्यानंतर मिलिंदला भेटल्यावर जुन्या प्रियकराच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत असल्याचे अंकिताने उघड केले. ते वारंवार बोलत होते आणि भेटत होते, तरीही तिला आपला भूतकाळ सोडून मिलिंदबरोबर नव्याने सुरुवात करणे कठीण जात होते. “जेव्हा मी त्याच्याबरोबर बाहेर जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मला तो आवडू लागला, कालांतराने त्याच्यावर प्रेम करू लागले आणि शेवटी मी त्याच्या प्रेमात पडले,” अंकिता म्हणते. “माझ्या मित्रांना थोडी काळजी वाटत होती, पण तेव्हा ते मिलिंदला खऱ्या अर्थाने ओळखू लागले, तेव्हा ते पाठिंबा देत होते. दुसरीकडे, माझ्या कुटुंबाला आमच्या सर्व मत अन विचारांबद्दल, वयातील अंतर, गंभीर असण्याबद्दल बरेच प्रश्न होते. पण जेव्हा ते मिलिंदला भेटले आणि तो किती नम्र आणि सभ्य आहे हे त्यांना कळले, तेव्हा त्या सर्वांनी आम्हाला मनापासून स्वीकारले.”

मिलिंद म्हणतो, “खरं सांगायचं तर, मी आणि अंकिता ने सहा वर्षांपूर्वी आमच्या पहिल्या भेटीत गेलो होतो तेव्हा लग्न आणि आमच्या वयातील फरक या संकल्पनेबद्दल बोललो होतो आणि आमच्यापैकी दोघांसाठीही लग्न खरंच महत्त्वाचं नव्हतं, हे मान्य केलं होतं. हे सगळं कधी बदललं हे मला माहीत नाही, पण ते झालं याचा मला आनंद आहे.” मिलिंद म्हणतो, “जग मला कसं ओळखते याचा मी कधीच विचार करत नाही. नक्कीच, मला थोडी नकारात्मकता आली. मला वाटले की संकुचित विचारसरणी काढायला हवी आहे.” असं म्हणतात एकदा प्रेमात पडले की जीवनात इतर गोष्टीच्या सीमा संपुष्टात येतात आणि खरे प्रेम असले तर वयातील अंतराला काहीच फरक पडत नाही. साधारण चार वर्ष मिलिंद सोमण आणि अंकिता कोनवार यांनी सर्व अडचणींना तोंड दिले होते आणि मीडियामध्ये बरेच आक्षेप असूनही विवाहबंधनात अडकण्यासाठी त्यांनी मानसिक तयारी झालेली होती.

milind and ankita somn with mother usha
milind and ankita somn with mother usha

२२ एप्रिल २०१८ रोजी मिलिंद सोमण आणि अंकित कोनवार यांनी केवळ जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित असलेल्या एका जिव्हाळ्याच्या विवाह सोहळ्यात लग्न केले. त्यांच्यात वयाचे अंतर असल्यामुळे त्यांनी लग्न झाल्यानंतर बराच काळ ही गोष्ट लपवली होती. असे असूनही, ते एक अनुकरणीय जोडपे आहेत, जे एकमेकांवर मनापासून प्रेम करतात, विविध प्रकारच्या शारीरिक खेळ आणि अंगमेहनत करतात आणि ज्यात मिलिंदची ८१ वर्षीय आई उषा सोमण ह्या देखील यांच्या सोबत अनवाणी धावणे, जोर काढणे आणि विविध खेळ खेळणे ह्यामध्ये सहभागी होतात. कदाचित हीच कारणे त्यांचे संबंध मजबूत करीत आहेत.

milind ankita and usha soman
milind ankita and usha soman

त्यांच्या भावी आयुष्याला कलाकार.इन्फो टीम तर्फे शुभेच्छा देत आजचा हा लेख संपवत आहे. तुम्हाला लेख आवडला असेल तर कमेंट मध्ये कळवायला विसरू नका, तसेच तुम्हाला आणखी कोणाविषयी जाणून घ्यायचे असल्यास तेही कळवा. असे केल्याने नवनवीन लेख लिहिण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळते आणि प्रेक्षकांशी संपर्कात राहण्यास मदतही होते. चला तर मग लवकरच भेटू एक नवीन सत्य स्टोरीसह kalakar.info या आपल्या हक्काच्या वेबसाईटवर.

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.