Breaking News
Home / ठळक बातम्या / बॉलिवूड अभिनेत्री अडकली विवाहबंधनात…चाहत्यांना दिला सुखद धक्का
yami gautam weds aditya dhar
yami gautam weds aditya dhar

बॉलिवूड अभिनेत्री अडकली विवाहबंधनात…चाहत्यांना दिला सुखद धक्का

बॉलिवूड अभिनेत्री “यामी गौतम” हिने नुकतेच आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत त्यावरून ती लग्नबांधनात अडकली आल्याचे समोर येत आहे. तिच्या या बातमीने चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. यामी गौतम हिने उरी चित्रपटाचा दिग्दर्शक “आदित्य धर” याच्या सोबत लग्नगाठ बांधली आहे. असे म्हटले जाते की उरी चित्रपटात काम करत असताना यामी आणि आदित्य यांच्यात प्रेमाचे सुरू जुळून आले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

aditya dhar with yami gautam
aditya dhar with yami gautam

यामी गौतम ही मूळची हिमाचल प्रदेशची तिचे वडील मुकेश गौतम हे चित्रपट दिग्दर्शक आहेत तर यामीची धाकटी बहीण सुरिली गौतम ही देखील हिंदी चित्रपट आणि मालिका अभिनेत्री आहे. विकी डोनर या चित्रपटाच्या माध्यमातून यामीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. बदलापूर, काबिल ,उरी, बाला, सनम रे, कुरिअर बॉय कल्याण, जुनूनियत, ऍक्शन जॅक्सन अशा अनेक चित्रपटातून तीने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. यामी गौतम Fair and lovely च्या जाहिरातीमुळे जास्त ओळखली जाऊ लागली होती. सुरुवातीला मॉडेलिंग , व्यावसायिक जाहिरातींमधून ती झळकली आणि प्रसिद्धीच्या झोतात आली. काही हिंदी मालिका देखील तिने अभिनित केल्या असून तिने साकारलेल्या भूमिकांचे नेहमीच कौतुक होताना दिसले. उरी:द सर्जिकल स्ट्राईक हा तिने अभिनित केलेला चित्रपट तुफान लोकप्रिय झाला. याच चित्रपटात काम करत असताना दिग्दर्शक आदित्य धर आणि गौतमी यांचे प्रेम जुळून आले. आदित्य धर हा बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक तसेच लेखक म्हणूनही ओळखला जातो. उरी चित्रपटाव्यतिरिक्त त्याने तेज, हाल ए दिल, डॅडी कुल-जॉईन द फुल, बुंद असे अनेक चित्रपट साकारले आहेत. अभिनेत्री यामी गौतमच्या अचानक झालेल्या या विवाहसोहळ्याची वाच्यता कुठेच करण्यात आली नव्हती त्यामुळे गुपचूप झालेले तिचे हे लग्न सध्या तिच्या चाहत्यांना आनंदून गेले आहे. यामी गौतम आणि आदित्य धर या नवदाम्पत्यास आयुष्याच्या या नव्या वाटचालीसाठी kalakar.info टीम तर्फे खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन!

yami with aditya dhar and vicky kaushal - Team of URI
yami with aditya dhar and vicky kaushal – Team of URI

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.