महेश कोठारे यांचा माझा छकुला या मराठी चित्रपटाच्या यशानंतर त्यांनी याच चित्रपटाचा सिकवल असलेला मासुम हा हिंदी चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. माझा छकुला या चित्रपटातून त्यांनी आपला मुलगा आदिनाथ कोठारेला लॉंच केलेले पाहायला मिळाले. आदिनाथने साकारलेला छकुला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला. या यशानंतर त्यांनी मासुम चित्रपट बनवायचे ठरवले १९९६ साली “मासुम” हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला. त्यावेळी या हिंदी चित्रपटालाही खूपच लोकप्रियता मिळाली होती. या चित्रपटात बालकलाकाराचे काम केले होते “ओमकार कपूर” याने आज ओमकार कपूर हिंदी सृष्टीतला एक प्रसिद्ध अभिनेता म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. १९९६ नंतर त्याने अनेक चित्रपटातून काम केले आहे आणि करत आहे मात्र त्याच्यात खूप मोठे ट्रान्सफॉर्मेशन झालेले दिसून येते.
मासुम चित्रपट हा ओमकारने अभिनित केलेला पहिलाच हिंदी चित्रपट होता या चित्रपटाच्या यशानंतर त्याला अनेक हिट चित्रपटात बालकलाकार साकारण्याची संधी मिळाली होती. ९० च्या दशकात जुदाई , जुडवा, हिरो नं 1, मेला अशा गाजलेल्या चित्रपटातून तो बालभूमिकेत दिसला. मधल्या काळात शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने संजय लीला भन्साळी, फराह खान यांच्याकडे बॉलिवूड चित्रपटासाठी असिस्टंट डायरेक्टरचे काम सांभाळले मात्र यात त्याचे मन रमेना आपल्याला हिरो बनायचंय हे मनाशी पक्क ठरवून हिरोच्या भूमिकेसाठी त्याने अनेक ऑडिशन द्यायला सुरुवात केली. अखेर “प्यार का पंचनामा2” या हिंदी चित्रपटात त्याला नायकाची भूमिका मिळाली. या चित्रपटातून तो नायक बनून प्रेक्षकांसमोर आला. त्यानंतर सियासत, कौशिकी, भूतपूर्व, भ्रम, झुठा कहीं का, Bisaat वेबसिरीज आणि चित्रपट, मालिकांच्या माध्यमातून त्याने अनेक महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. आज इतक्या वर्षांतरचा हा मासुम हिंदी चित्रपटातून नायकाच्या भूमिका साकारतोय हे त्याच्यासाठी मोठ्या कौतुकाचे काम आहे कारण या झगमगत्या दुनियेत टिकून राहणे भल्या भल्यांना जमलेले नाही….