मराठी मालिका अभिनेत्री मानसी नाईक हिने २७ मे २०२१ रोजी दुसरा विवाह केल्याचे सोशल मीडियावरून कळवले आहे. गुरुवारी मानसी नाईक ही मुंबईतील धृवेश कापुरीया सोबत विवाहबद्ध झाली आहे. धृवेश कापुरीया हा सीटेल इंडिया कंपनीत कार्यरत असून द सोसायटी गुरू या सिक्युरिटी गार्डचा संस्थापक आणि सर्वेसर्वा आहे.
मानसीने मिठीबाई कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे अभिनयाचे बाळकडू तिला तिच्या वडिलांकडून मिळाले होते. मानसीचे वडील प्रदीप नाईक हे रंगभूमीवरचे जाणते कलाकार त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत मानसीने मराठी मालिका क्षेत्रात पाऊल टाकले. कॉलेजमध्ये असताना अनेक एकांकिका तिने गाजवल्या होत्या. गणपती बाप्पा मोरया ही तिने अभिनित केलेली पहिलीच टीव्ही मालिका . यात पार्वती मातेची भूमिका तिने अभिनित केली होती. तिच्या या सोज्वळ भूमिकेचे खूप कौतुक झाले होते. त्यानंतर ललित २०५, तू माझा सांगाती आणि स्वराज्यजननी जिजामाता अशा मालिकांमधून मानसीने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. आई रिटायर होते हे व्यावसायिक नाटक तिने साकारल होत तर स्वराज्य जननी जिजामाता मालिकेत सोयराबाईंची भूमिका तिने साकारली होती. प्रसिद्ध अभिनेता “अक्षर कोठारी ” सोबत मानसीचा पहिला विवाह झाला होता यादोघांनी चाहूल २ या मालिकेत पती पत्नीची भूमिका साकारली होती. अक्षर कोठारी सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘स्वाभिमान ‘ ही मालिका अभिनित करत आहे. मानसी आणि अक्षरचा काही वर्षांपूर्वीच घटस्फोट झाला होता. त्यानंतर हे दोघे कधीच एकत्र पाहायला मिळाले नाहीत. मानसीने लग्नाअगोदर मुंडावळ्या बांधून मेहेंदी सोहळ्याचे फोटो शेअर केले होते त्यावरून ती लवकरच लग्न करणार असल्याचे तिच्या चाहत्यांना कळले होते. मानसी आणि धृवेश या नवदाम्पत्यास आयुष्याच्या या नव्या प्रवासासाठी कलाकार.इन्फो टीम कडून खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन.
kalakar.info ची टीम सतत नवीन रंजक गोष्टी तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करते, तुम्हाला त्या आवडत असतील अशी आशा आहे. तुमच्याही कुंचल्यात काही गमती जमती किंवा कलाकारांचे किस्से असतील तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये किंवा फेसबुक वर जरूर कळवा; आम्ही ते पब्लिश करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. लोभ असावा, धन्यवाद.