Breaking News
Home / मराठी तडका / सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील लतीकाच्या सख्या बहिणीने केलं होतं या चित्रपटात काम…
ashi hi dnyaneshwari akshata naik
ashi hi dnyaneshwari akshata naik

सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील लतीकाच्या सख्या बहिणीने केलं होतं या चित्रपटात काम…

कलर्स मराठीवरील “सुंदरा मनामध्ये भरली” या लोकप्रिय मालिकेतून लतीकाच्या प्रमुख भूमिकेत अभिनेत्री “अक्षया नाईक” झळकताना दिसत आहे. लतीकाच्या रूपातली एक वजनदार अभिनेत्री म्हणून लतिकाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले आहे. मालिकेत नुकत्याच झालेल्या सज्जनरावांच्या पुनरागमनामुळे आता या मालिकेला खरी रंगत चढली आहे असे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. आज मालिकेतील लतिका म्हणजेच अक्षया नाईक हिच्या कुटुंबाबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात…

अभिनेत्री अक्षया नाईकला लहानपणापासूनच अभिनय आणि डान्सची आवड होती शिवाय तिला गाण्याचीही तितकीच आवड आहे. अक्षयाने सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेपूर्वी ये रिश्ते है प्यार के, ये रिश्ता क्या कहलाता है यासारख्या हिन्दी मालिकांमध्ये देखील काम केले आहे. ऑडिशनवेळी आपल्या शरीरामुळे तिला अनेकदा नाकारण्यात आले होते मात्र याच सुंदरतेने तिला मराठी मालिकेत प्रमुख नायिका साकारण्याची संधी मिळवून दिली, याचमुळे लतीकाला अमाप लोकप्रियता मिळाली हे विशेष. सुंदरा मनामध्ये भरली ही तिची पहिलीच मराठी मालिका आहे. यात तिला मनवा नाईकने प्रथमच प्रमुख भूमिका साकारण्याची संधी दिली. याशिवाय अक्षयाने ‘फिट इंडिया’ या बॉलिवूड चित्रपटात देखील काम केले आहे.

father arvind naik, akshata & akshaya with mother - family photo
father arvind naik, akshata & akshaya with mother – family photo

अक्षयाचे वडील अरविंद नाईक हे मराठी चित्रपट निर्माते म्हणून ओळखले जातात. अक्षता प्रॉडक्शन्स, मुंबई या निर्मिती संस्थेमधून त्यांनी काही मराठी चित्रपटांची निर्मिती केली. ‘अक्षता’ आणि ‘अक्षया’ या त्यांच्या दोन मुली आहेत. १९९८ साली ‘अशी ही ज्ञानेश्वरी’ हा चित्रपट त्यांनी निर्मित केला होता. ज्यात त्यांनी आपली थोरली मुलगी अक्षताला बालकलाकार म्हणून लॉंच केले होते. रमेश भाटकर, निशिगंधा वाड, कुलदीप पवार, सयाजी शिंदे अशा अनेक दिग्गज कलाकारांच्या चित्रपटात महत्वाच्या भूमिका होत्या. अक्षयाची थोरली बहीण “अक्षता नाईक” हिने या चित्रपटात छोट्या ज्ञानेश्वरीची भूमिका साकारली होती. चित्रपटाचे संपूर्ण कथानक या बाल ज्ञानेश्वरी भोवतीच गुरफटलेले पाहायला मिळेल.

अशी ही ज्ञानेश्वरी या चित्रपटानंतर अक्षता इतर कुठल्या चित्रपटात दिसली नसली तरी तिची धाकटी बहीण अक्षयाने अभिनय क्षेत्रात आता चांगलाच जम बसवलेला पाहायला मिळतो. अक्षताचे लग्न मिहीर सावंत यांच्याशी झाले असून सध्या ती तिच्या कुटुंबासोबत मुंबईत स्थायिक आहे. अक्षया प्रमाणेच अक्षताला देखील डान्सची विशेष आवड आहे. या दोघींचे डान्सचे व्हिडीओ अक्षया आपल्या इंस्टाग्रामवर नेहमीच शेअर करताना दिसते. आज अक्षताने अभिनयातून काढता पाय घेतला असला तरी मराठी चित्रपटातली एक बालकलाकार म्हणून ती कायम प्रेक्षकांच्या स्मरणात राहील. या दोघी कलाकार बहिणींना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी kalakar.info टीम तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा…

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.