नमस्कार,
मित्रहो बॉलिवूड ची दुनिया म्हणजे भरपूर मेहनत आणि अफाट पैसा अशी आहे. या चंदेरी दुनियेत अनेक कलाकार आपली विशेष ओळख मिळवतात. प्रत्येक जण आपापल्या कलेने लोकांची मने जिंकतात. इथे जो आपल्या कष्टामध्ये सातत्य ठेवतो त्याला एक दिवस यशाचे शिखर नक्की मिळते. कितीतरी असे स्टार आहेत ज्यांनी बॉलिवूड मधून जगभर आपले नाव कमावले आहे, यामध्ये अनेक अभिनेत्रींचा सुद्धा समावेश आहे. काही अभिनेत्री भरपूर प्रसिद्ध आहेत, त्यांच्या सौंदर्याने. अभिनयाने त्या नेहमीच चर्चेत असतात. अशा अनेक सुंदर अभिनेत्री मध्ये गणली जाणारी अभिनेत्री करीना कपूर खान हिच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
करीना ही सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध अभिनेत्री आहे, जगाच्या पाठीवर सर्वत्र तीचे चाहते आहेत. करीना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते तसेच ती सोशल मीडियावर खूपच चर्चेत असते. अनेक जण तीचे दिवाने आहेत, तीचे सगळे चित्रपट लोक आवडीने पाहतात. रिफुज्यी या चित्रपटातून तीने आपल्या करिअर ची सुरुवात केली होती, यानंतर तीने अनेक चित्रपटात काम केले आहे. कभी खुशी कभी गम, में प्रेम की दिवाणी हूं, यादेँ, गोलमाल, जब वी मेट, या व अशा अनेक चित्रपटात तीने उत्कृष्ट अभिनय केला आहे. करीना ही रणधीर कपूर यांची मुलगी आहे, याशिवाय ती सुप्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूर हिची बहीण आहे. “कहो ना प्यार है ” हा तीचा कदाचित पहिला चित्रपट बनला असता. पण तीने हा चित्रपट अर्ध्यातच सोडला. नंतर तिने अभिषेक बच्चन सोबत फिल्म रिफ्युजी मध्ये काम केले आणि तिच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. करीना एक अस्सल कलाकार आहे, ती कोणत्याही कॅमेऱ्यासमोर फिट होते. प्रत्येक चित्रपटातील तीचा अभिनय रसिकांच्या भावनांना स्पर्श करून जातो. कितीही अवघड काम असो ती त्याला सहज सोपे बनवून मांडते, त्यामुळे प्रेक्षक सहज तिच्या प्रेमात पडतात.
बेबोने भरपूर चित्रपट केले आहेत, तीने संपत्ती देखील अमाप मिळवली आहे. तिच्या संपत्ती बद्दल जाणून घ्यायचे ठरवले तर आपण थक्क होऊन जाईल इतक्या कोटींची ती मालकीण आहे. करिनाला लक्झरी कार खूप आवडतात.ती एकूण ४१३ कोटींची मालकीण आहे. २०१४ मध्ये करीना ७४.७४ कोटींची मालकीण होती ,नंतर तिच्या संपत्ती मध्ये वाढ होत गेली. असे म्हणतात की करीना वर्षाला जवळपास ७३ कोटी रुपये कमावते. त्यामुळे तिच्या संपत्ती मध्ये झपाट्याने वाढ झालेली दिसून येते. करिणाचे स्वतःचे एक मोठे आलिशान घर आहे, तीने वांद्रे येथील हाइट अपार्टमेंट मध्ये ४BHK फ्लॅट घेतला आहे.तीला लक्झरी कारची खूप आवड आहे, तिच्याकडे मर्सिडीज बेंज एस स्कास नावाची १.४० कोटींची कार आहे. तसेच तिच्याकडे ऑडी क्यू ७ ही देखील कार आहे, या कारची किंमत ९३ लाखांची आहे. करीना जेवढी जास्त प्रसिद्ध आहे तेवढी जास्त ती श्रीमंत देखील आहे. सर्व श्रीमंत अभिनेत्री मध्ये तीचे नाव सुद्धा आवर्जून घेतले जाते. तीने स्वहिमतीने जगभरात आपली ओळख निर्माण केली आहे. तीचे प्रत्येक काम कौतुकास्पद आहे. करिनाला पुढील आयुष्यासाठी kalakar.info टीम तर्फे भरभरून शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा, तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.