Breaking News
Home / बॉलिवूड / चला हवा येऊ द्या नंतर कुशल बद्रिकेची हिंदी रिऍलिटी शोमध्ये एन्ट्री
kushal badrike shreya bugade
kushal badrike shreya bugade

चला हवा येऊ द्या नंतर कुशल बद्रिकेची हिंदी रिऍलिटी शोमध्ये एन्ट्री

झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या शोने गेली ९ वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. पण आता झी मराठी वाहिनीने या शोचा गाशा गुंडाळलेला पाहायला मिळतो आहे. गेल्या काही दिवसांपासून झी मराठीवर चला हवा येऊ द्या शोचे जुने एपिसोड टेलिकास्ट केले जात होते. अर्थात नवीन मालिकांच्या आगमनानंतर आता चला हवा येऊ द्या शो बंद करण्यात आला आहे. त्यामुळे शो च्या कलाकारांना वेगळ्या पर्यायाची निवड करावी लागत आहे. काही दिवसांपूर्वीच श्रेया बुगडे हिने तिच्या मैत्रिणीसह बिग फिश या नावाने मुंबईत रेस्टॉरंट सुरू केले होते.

kushal badrike sunayanan badrike
kushal badrike sunayanan badrike

आता कुशल बद्रिकेलाही हिंदी रिऍलिटी शोमध्ये झळकण्याची संधी मिळत आहे. सोनी टीव्ही वाहिनीवर लवकरच मॅडनेस मचाएंगे हा कॉमेडी शो सुरू होणार आहे. हुमा कुरेशी या शोचे सूत्रसंचालन करणार असे म्हटले जात आहे. या कॉमेडी शोमध्ये कुशल बद्रिकेलाही महत्वाची भूमिका देण्यात येणार आहे. द कपिल शर्मा या शोला आजवर प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. या शोच्या जागी आता मॅडनेस मचाएंगे हा शो दाखवला जाणार आहे. हर्ष गुजराल, अंकिता श्रीवास्तव, केतन सिंग, गौरव दुबे, स्नेहील मेहरा, इंदर सहानी या कलाकारांना शोमध्ये संधी मिळणार असल्याचे सांगितले जाते. कुशल बद्रिकेसह श्रेया बुगडेला देखील या शोमध्ये आमंत्रित केले असल्याचे म्हटले जात आहे. पण यावर अजून श्रेयाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

shreya bugde
shreya bugde

मॅडनेस मचाएंगे या शोचा पहिला प्रोमो सोनी वाहिनीने प्रसारित केला आहे. त्यात कुशल बद्रिकेला महत्वाचे स्थान देण्यात आल्याचे दिसून येते. अर्थात या कॉमेडी शोमध्ये विनोदवीरांची स्पर्धा असणार की कपिल शर्मा सारखा शो रंगणार हे अजून जाहीर झालेले नाही. पण कुशल बद्रिकेच्या चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बातमी ठरली आहे. कुशल बद्रिके हिंदी कॉमेडी शोचा भाग बनणार असे समजताच सेलिब्रिटींनीही कुशलचे अभिनंदन केले आहे. याअगोदर देखील चला हवा येऊ द्या शो मधील  भारत गणेशपुरे, सागर कारंडे आणि भाऊ कदम यांनी हिंदी कॉमेडी शोमध्ये सहभाग दर्शवला होता. पण आता कुशल बद्रिकेला ही संधी देण्यात आली आहे. तेव्हा कुशल बद्रिके त्याच्या विनोदी अभिनयाने हिंदी भाषिक प्रेक्षकांचीही मनं नक्कीच जिंकेल असा विश्वास आहे.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.