Breaking News
Home / ठळक बातम्या / या अभिनेत्याच्या पत्नीचे नुकतेच झाले निधन.. कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली
bhushan kadu family
bhushan kadu family

या अभिनेत्याच्या पत्नीचे नुकतेच झाले निधन.. कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

विनोदी अभिनेता भूषण कडू यांच्या कुटुंबामध्ये आज शोककळा पसरली आहे. भूषण कडू याची पत्नी कादंबरी कडू यांचे आज सकाळीच महा ‘मारीने निधन झाल्याचे समोर आले आहे. या बातमीने सर्वच कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

भूषणची पत्नी कादंबरी कडू यांना गेल्या काही दिवसांपूर्वी को’रो’ ना झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्यांना ठाण्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने त्यांच्या प्रकृतीत आणखीनच बिघाड होऊ लागला . नंतर त्यांना केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु आज सकाळीच त्यांनी उपचार सुरू असताना अखेरचा श्वास घेतला. भूषण आणि कादंबरी याना ८ वर्षांचा एक मुलगा आहे. भूषणची ही दुसरी पत्नी असल्याचे मीडियाने सांगितले आहे. भूषण कडूने चित्रपट मालिका, नाटक तसेच कॉमेडीची gst एक्सप्रेस मधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. कलर्स मराठीवरील बिग बॉसच्या शोमध्येही त्याने पार्टीसिपेट केले होते. कादंबरी कडू यांना आमच्या संपूर्ण समूहाकडून भावपूर्ण श्रद्धांजली…

kadambari kadu with bhushan
kadambari kadu with bhushan

नवनवीन कलाकारांविषयी जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता तसेच आम्हाला पत्रे देखील लिहू शकता. आमची टीम जास्तीत जास्त मागणी आलेल्या चाहत्यांना प्राधान्य देईल. आमच्याबरोबर जोडलेले रहा आणि आमच्या फेसबुक पेज आणि ट्विटर वर देखील आपल्या आवडत्या नायक नायिकांसाठी लाईक, फॉलो आणि शेअर करा.

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.