नमस्कार,
‘पवई फिल्टर पाडा’ म्हणून ओळख असणारा गौरव मोरे मुंबईमध्ये राहतो. एक साधा आणि सरळ असा हा कलाकार आपल्या सर्वांना माहीतच आहे. जो सध्या चालू असलेला कॉमेडी शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यामध्ये कमाल अशी कॉमेडी करताना दिसत आहे. तो आपले काम करताना त्या कामामध्ये पूर्णपणे झोकून जातो हे मात्र नक्की. फक्त मराठी नाटक किंवा मालिका नव्हेच तर त्याने काही हिंदी चित्रपटात सुद्धा काम केले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नुकताच गौरवला त्याच्या अप्रतिम अभिनयासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ‘संजू’ या चित्रपटातील त्याच्या छोट्या भूमिकेने त्याने सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते. या चित्रपटामध्ये गौरवने रणबीर कपूर सोबत काम केले आहे. याचा चांगलाच प्रतिसाद त्याला मिळाला होता. फक्त विनोदी भूमिकाच नाही तर गंभीर भूमिका सुद्धा उत्कृष्टरित्या साकारल्या आहेत. गौरव मोरे याने S.K. Soumaya college मध्ये एकपात्री आणि एकांकिका मधून आपल्या अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर बऱ्याच कॉलेजमध्ये त्याने एकांकिका केल्या. तसेच ‘युथ फेस्टिवल’ मध्ये देखील भूमिका केल्या. पहिल्यांदा प्रसाद खांडेकर यांच्यासोबत ‘जळू बाई हळू’या नाटकात काम करण्याची संधी त्याला मिळाली. त्यानंतर प्रसाद खांडेकर यांच्याशी त्याची मैत्री झाली.
त्यांच्यासोबत झालेल्या मैत्रीने गौरव त्यानी लिहलेल्या स्किटमध्ये आणि तसेच नाटकामध्ये सुद्धा काम करू लागला. ते नाटक म्हणजे ‘पडद्याआड’ होय.’माझिया प्रियाला प्रीत कळेना’ ही गौरवची पहिली मालिका होय. या मालिकेत त्यांनी उत्कृष्ट रित्या त्याची विनोदी भूमिका स्वीकारली. सध्याही तो लोकांना हसवण्याचंच काम करत आहे. वनिता खरात आणि ओंकार भोजने यांच्या सोबत काम करत असलेल्या कॉमेडी स्किट मधून तो लोकांना भरभरून हसवतो. कामयाब, झोया फॅक्टर यामध्ये सुध्दा त्याने त्याची भूमिका उत्तमपणे पार पाडली. विकी वेलिंगकर ह्या मराठी चित्रपटात तो आपल्याला दिस ला होता परंतु, त्या आधी त्याची खरी ओळख त्याला श्रीकांत पाटील मुख्य भूमिका असलेल्या गावठी चित्रपटातून मिळाली. त्याच्या खऱ्या आयुष्याची सुरुवात येथूनच झाली. सध्या तो कॉमेडी शो मधील प्रत्येक स्कीट मधून सर्वांना हसविण्याचा काम करत आहे.
गौरव स्वतःवर कशाप्रकारे पंच काढून प्रेक्षकांना हसवता येईल याकडे लक्ष देतो. जे सर्वांना जमत नाही, हेच तर टॅलेंट आपल्याला गौरव मध्ये दिसेल.गौरव मोरेला पावलोपावली संधी मिळू दे. अशीच प्रगती होत राहो. गौरवला त्याच्या भावी जीवनासाठी kalakar.info टीमतर्फे खूप खूप शुभेच्छा…! तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला. अश्याच मनोरंजनात्मक लेखासाठी लाईक करत रहा. हा लेख कसा वाटला हे कमेंट द्वारे नक्की कळवा. हा लेख आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर सुद्धा करत रहा.