झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे टीआरपीच्या रेसमध्ये या मालिकेने टॉप १० च्या यादीत नाव नोंदवले आहे. मालिकेचा टीआरपी हे मालिकेच्या कथानकावर आणि त्यातील कलाकारांवर अवलंबून असतो असे म्हटले जाते. जिथे हृता सारखी गुणी अभिनेत्री या मालिकेला लाभली आहे त्यामुळे मालिकेचा टीआरपी निश्चितच वाढणार याची प्रेक्षकांना पूर्ण खात्री आहे. हृताचा फॅनफॉलोअर्स खूप चांगला आहे तसेच मालिकेतील अजिंक्य राऊत, विनम्र बाभळ, रिना अगरवाल, शर्वरी कुलकर्णी, अरुण नलावडे, पूर्णिमा तळवळकर, रुपलक्ष्मी शिंदे या कलाकारांनी देखील आपापल्या भूमिका अगदी चोख बजावल्या आहेत.
मात्र आता मालिकेसाठी धक्कादायक बातमी अशी आहे की हृता ही मालिका सोडणार आहे. हृता दुर्गुळे या मालिकेचा प्राण आहे तिने ही मालिका सोडल्यास प्रेक्षक नाराज होणार याची पूर्ण कल्पना आहे मात्र हृता ही मालिका का सोडतीये याचे कारण समोर आले आहे. मालिकेच्या सेटवर स्वच्छता नसते यावरून हृताने ही मालिका सोडली असल्याचे सांगितले जाते. तसेच मालिकेच्या निर्मात्या टीमशी हृताचा वाद झाला होता त्यामुळे ईने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र एक महिन्याचा ऍग्रिमेंट असल्या कारणाने तीला हे ऍग्रिमेंट पूर्ण करावे लागणार आहे. एकीकडे हृता आणि निर्मात्यांचा वाद झाला म्हणून हृता ही मालिका सोडणार असे म्हटले जाते.
मात्र दुसरीकडे हृता काही दिवसातच हिंदी मालिका दिग्दर्शक प्रतीक शाह सोबत लग्न करणार असल्याने ती ही मालिका सोडत आहे असेही बोलले जात आहे. हृता दुर्गुळे मालिका सोडत असल्याने तिच्या जागी आता दुसऱ्या अभिनेत्रीचा शोध सुरू झाला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात हृताच्या जागी आता कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहे. अर्थात हृताने तिच्या सहजसुंदर अभिनयाने दिपूची भूमिका गाजवली आहे त्यामुळे नवख्या नायिकेसाठी ही भूमिका आव्हानात्मक ठरणार आहे.