तुझ्यात जीव रंगला मालिकेमुळे हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. बॅक स्टेज आर्टिस्ट ते मराठी मालिकेतील प्रमुख नायक, इथपर्यंत मजल मारलेला हार्दिक लवकरच अक्षया देवधर सोबत विवाहबद्ध होत आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी मित्रांच्या घरी जाऊन केळवणाचा आस्वाद घेतला होता. त्यामुळे काहीच दिवसात हे दोघेही लग्न करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. लग्नानंतर हार्दिक जोशी मराठी बिग बॉसच्या ४ थ्या सिजनमध्ये सहभागी होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. येत्या २ ऑक्टोबर पासून कलर्स मराठी वाहिनीवर बहुचर्चित बिग बॉसचा चौथा सिजन प्रसारित केला जाणार आहे. यावेळच्या सिजनमध्ये १६ स्पर्धक सहभागी होणार असल्याचे सांगितले जाते.

शोमध्ये सहभागी होणाऱ्या संभाव्य सदस्यांची यादी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या यादीत हार्दिक जोशीचे नाव निश्चित असल्याचे खात्रीदायक माहिती समोर येत आहे. यावरून मीडियाने हार्दीकला याबाबत प्रश्न विचारला मात्र यावर हार्दीकने स्पष्ट उत्तर देणे टाळले. बिग बॉसच्या घरात जाण्याबाबत हार्दिक नक्कीच उत्सुक असणार आहे. मात्र याबाबत त्याने सस्पेन्स वाढवण्याचे काम केले आहे. तो म्हणतो की, मी बिग बॉसच्या घरात जाणार किंवा नाही ही गोष्ट मी आताच जाहीर करणार नाही. हा सस्पेन्स मला तसाच राखून ठेवायचा आहे. ही एक्साईटमेंट आताच उघड करणार नाही. येत्या काही दिवसातच तुम्हाला याबाबत समजणार आहे. यावेळच्या सिजनमध्ये १६ स्पर्धक सहभागी होणार असल्याचे सांगितले जाते.

त्यामुळे सध्या आम्ही दोघेही लग्नाच्या गडबडीत आहोत. हार्दिकने बिग बॉसच्या घरात जाण्याबाबतचा सस्पेन्स राखून ठेवला असला तरी तो निश्चितच या सिजनचा भाग असणार आहे, अशी खात्रीशीर बातमी मीडिया माध्यमातून पसरली आहे. हार्दिक सोबत शर्वरी लोहकरे हिच्या देखील नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. युट्युब स्टार तुषार गोसावी देखील या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे. दाक्षिणात्य चित्रपटात काम केलेली अभिनेत्री तेजश्री जाधव आणि माझ्या नवऱ्याची बायको मधील रुचिरा जाधव ह्या देखील बिग बॉसच्या घरात जाण्यास उत्सुक असल्याचे सांगितले जात आहे. अर्थात या याद्या संभाव्य मानल्या जात असल्या तरी ह्या चार जणांवर शिक्कामोर्तब झाला असल्याचे खात्रीशीर सांगितले आहे.