Breaking News
Home / जरा हटके / तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील या मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलंत का ?
sonalika joshi tarak mehta ka oolta chashma
sonalika joshi tarak mehta ka oolta chashma

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील या मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलंत का ?

२००८ सालापासून आजपर्यंत “तारक मेहता का उल्टा चश्मा” या हिंदी मालिकेला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे. विनोदी मालिका आणि नेहमीच वेगळा विषय हाताळणाऱ्या या मालिकेने आजवर प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. आज या मालिकेतील मराठमोळ्या अभिनेत्रीचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त या अभिनेत्रीने बालपणीचा आपला एक फोटो शेअर केला आहे. तर या फोटोतली ही अभिनेत्री आहे “सोनालिका जोशी”.

५ जून १९७६ रोजी नाशिक येथील नांदगाव याठिकाणी तिचा कांबळे कुटुंबात जन्म झाला. तारक मेहता का… मालिकेतील गोकुळधाम सोसायटी मधल्या आत्माराम भिडेची पत्नी अर्थात “माधवी भिडे” ही व्यक्तिरेखा ती साकारत आहे. लोणची पापड विकणाऱ्या भिडे भाभींचा हसरा खेळता स्वभाव प्रेक्षकांना खूपच भावला आहे त्यामुळे हे पात्र प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरलेले पाहायला मिळत आहे. सोनालिका जोशी हिने सुरुवातीला अनेक मराठी मालिका, नाटकांतून आणि चित्रपटातून काम केले आहे. मूळची नाशिकची असलेली सोनालिकाचे बालपण नांदगाव येथे गेले. कवी पद्माकर कांबळे हे सोनालिकाचे वडील. सोनलिकाने इतिहास विषयातून बीएची पदवी मिळवली. फॅशन डिझायनिंग आणि अभिनयाचे धडेही तिने गिरवले आहेत. सुरुवातीला नाटकांतून काम करता करता दूरदर्शनवरील मालिकांमध्ये तिला झळकण्याची संधी मिळाली. वारस सारेच सरस हा तिने अभिनित केलेला मराठी चित्रपट.

sonalika joshi old photos
sonalika joshi old photos

सोनालीकाला खरी ओळख मिळाली ती “तारक मेहता का उल्टा चष्मा” या मालिकेतील भिडे भाभीच्या भूमिकेमुळे. आज लोकं मालिकेतील कलाकारांना त्यांच्या खऱ्या नावाऐवजी त्यांनी साकारलेल्या पात्रांमुळेच ओळखले जाते एवढी लोकप्रियता या मालिकेने मिळवली आहे. एवढे वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत असलेल्या मालिकेतील बऱ्याचशा कलाकारांनी ही मालिका सोडली मात्र सोनालिका २००८ सालापासून आजतागायत ठाण मांडून असलेली पाहायला मिळते. आत्माराम भिडे आणि माधवी भिडे हे मालिकेतील दोन्ही कलाकार मराठीच, आत्माराम भिडेची भूमिका अभिनेते मंदार चांदवडकर यांनी साकारली आहे त्यामुळे हे दोन्ही मराठमोळे कलाकार आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसतात. व्यक्तिगत आयुष्यात २००१ साली सोनालिका ही समीर जोशी यांच्याशी विवाहबद्ध झाली. समीर जोशी हे देखील अभिनेते असून त्यांनी बऱ्याच मराठी चित्रपटात काम केले आहे. सोनालिका आणि समीर यांना एक मुलगी आहे तिचे नाव आर्या. आज सोनलिकाचा वाढदिवस आहे यानिमित्ताने तिला kalakar.info टीम तर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!…

sonalika joshi bhide bhabhi
sonalika joshi bhide bhabhi

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.