Breaking News
Home / ठळक बातम्या / शशांक केतकरसोबतच्या घटस्फोटानंतर अभिनेत्री तेजश्री प्रधान पुन्हा पडली प्रेमात?
actress tejashri pradhan is now engaged
actress tejashri pradhan is now engaged

शशांक केतकरसोबतच्या घटस्फोटानंतर अभिनेत्री तेजश्री प्रधान पुन्हा पडली प्रेमात?

मित्रहो चित्रपटसृष्टी ही खूपशा कलाकारांच्या रंजक कथांनी भरलेली आहे, यामध्ये प्रामुख्याने अनेक तारे असे आहेत की त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींनी ही दुनिया नेहमी चमकत राहते. टेलिव्हिजनवरील मालिकामध्येही आजकाल भरपूर विविधता आढळते. नवनवीन काही तरी शिकायला मिळते, नवीन कलाकार ही असे आहेत ज्यांचा अभिनय रसिकांना मालिकेचे वेड लावून जातो. सर्वच मालिकांचे कथानक देखील खूप उत्कृष्ट आहे, प्रत्येक वेळी कल्पनेबाहेरील घटना घडत राहतात त्यामुळे प्रेक्षक दिवसेंदिवस त्याकडे आकर्षित होतात. त्यांचे आकर्षण मालिकेसोबतच त्यातील कलाकारांकडे सुद्धा जास्त असते, म्हणून त्यांच्या खऱ्या आयुष्यात काय चालू आहे हे सुद्धा जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात.

मित्रहो, टेलिव्हिजनवर झी मराठी वाहिनीवर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात, तसेच त्यावरील रोजच्या मालिका देखील प्रचंड गाजल्या आहेत. त्यातीलच एक लोकप्रिय मालिका म्हणजे “अग्गबाई सासूबाई” ही मालिका घराघरात आवर्जून पाहिली जाते. यातील सर्व पात्र उत्तम आहेत, प्रत्येक जण आपली भूमिका सुंदरपणे पार पाडतो, त्यांची अभिनयशैली, हावभाव प्रेक्षकांना आकर्षित करतात. झी मराठी वरील सर्व लोकप्रिय मालिकांमधील या मालिकेचे नाव आवर्जून घेतले जाते. मालिकेतील शुभरा म्हणजेच तेजश्री प्रधान आपल्या सर्वांच्याच ओळखीची आहे. या आधी होणार सून मी या घरची या मालिकेत ती झळकली होती आणि अभिनयाच्या जोरावर त्यातूनही ती भरपूर प्रसिद्ध झाली होती. तीने आजवर झेंडा, शर्यत, लग्न पाहावे करून, ती सध्या काय करते या व अशा अनेक चित्रपटात काम केले आहे, तीचा अभिनय खूप रेखीव वाटतो. अशा या सुंदर अभिनेत्रीच्या अभिनयावर रसिकजण खूपच प्रभावित आहेत पण तिच्या वैयक्तिक आयुष्यात आजवर तीने खूप संघर्ष केला आहे.

tejashri pradhan photos
tejashri pradhan photos

नजीकच्या काळात तीचे नवीन चित्रपट जरी आले नसतील तरी सोशल मीडियावर ती नेहमीच सक्रिय असते शिवाय मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येतेच. हल्ली तीच्या चाहत्यांमध्ये एक चर्चा सुरू आहे ती म्हणजे तेजश्री प्रधान आणि आशितोष पत्की यांच्यात नेमकं कोणतं नातं आहे. ते दोघेही आजकाल खूप एकत्र दिसतात, फोटो शेअर करतात. त्यातच २ जूनला तेजश्रीचा वाढदिवस होता आणि तिच्या वाढदिवसादिवशी तीला आशितोषने खूप खास पद्धतीने शुभेच्छा दिल्या होत्या. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने म्हटले होते की माझी प्रिय मैत्रीण तू माझ्यासाठी खूप खास आहेस, मी तुझी प्रेमाने काळजी घेईन, मला साथ दिल्याबद्दल, माणूस म्हणून घडवल्याबद्दल, समजून घेतल्याबद्दल तुझे खूप खूप आभार आणि असे म्हणून त्याने तिला शुभेच्छा दिल्या होत्या.

tejashri and ashutosh serial aga bai sasubai
tejashri and ashutosh serial aga bai sasubai

यावरून अनेक नेटकरी सोशल मीडियातून त्यांच्यातल्या नात्याबद्दल शंका उपस्थित करत आहेत. दोन्ही कलाकारांमध्ये मैत्रीपलीकडे काही असू शकेल का याची प्रेक्षक वाट पाहून आहेत. आपली आवडती जोडी नवीन गोंडस बंधनात अडकलेली पाहायला प्रेक्षकांना नक्की आवडेल यात शंका नाही असे असले तरीही हे दोघे मैत्रीच्या नात्यात नेहमी बांधील राहोत ही सदिच्छा. मित्रहो तुम्हाला मालिकेतील त्यांची जोडी आणि अभिनय कसा वाटतो हे आम्हाला कमेंट करून कळवायला विसरू नका.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.