बॉलिवूडमध्ये चित्रपट काही वेळ चालून नंतर त्याचा विसर पडतो पण हिंदी मालिका क्षेत्रामध्ये अस काही होत नाही या मालिका दिवसेंदिवस नवनवीन विषय घेऊन येत प्रेक्षकांनच्या मनात घर करून राहतात. सध्या टीव्ही चॅनेलवर अशी एक धारवाईक मालिका आहे ज्याची विनोदशैली तुम्हाला थक्क करून सोडेल, टिव्ही वर सर्वाधिक काळ आपला अधिराज्य गाजवणारी मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ या मालिकेतील सर्व कलाकार अगदी अभिनयाच्या बाबतीत उत्तम आहेत त्यांचा अभिनय प्रेक्षक खूप पसंत करतात पण आज आम्ही याच मालिकेतील अश्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत जे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. तरुण असो की म्हातारा, तारक मेहता का उल्टा चष्मा.’ प्रत्येक तरुण वर्ग आणि प्रत्येक वयोगटातील लोकांमध्ये ही मालिका लोकप्रिय आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा.’ हा सुरुवातीपासूनच खूप लोकप्रिय बनलेला कार्यक्रम आहे. या शोच्या प्रत्येक पात्राची कहाणी ही खूपच भन्नाट आहे. सर्वांना हे माहीत असेलच की जेठालाल हे गोकुळधाम सोसायटीमध्ये बबीताला सर्वात जास्त पसंत करत असतात. त्यांची एक स्माईल जेठालालचा दिवस बदलून टाकते . बबिता आणि जेठा यांच्यातील हे गोड-तोड नातं भरपूर वेगळं आहे, पण आता शोमधील या सुंदर जोडीवर कोणाची तरी नजर लागली आहे असे दिसून येते आहे.
जेठालालला बबीता किती आवडते हे सांगण्याची तुम्हा लोकांना गरज नाही. ते तुम्ही दररोज पाहत असलाच, पण आता शोमध्ये असा एक ट्विस्ट आला आहे की बबिताने जेठालालला खूप रागाने घरातून बाहेर काढले आहे. इतकेच नाही तर बबीताने जेठालाल यांनी आणलेल्या फुलांचा सुंदर पुष्पगुच्छ खाली फेकला आहे. त्याचबरोबर मध्येच शो मध्ये बबिता यांच्या पतीची भूमिका साकारणारे अय्यर यांनी जेठालाल सोबतची असलेली दुष्मनी यांचा हिसाब ‘किताब करून टाकला आहे . जेठालालचा हात धरून त्याने घराबाहेर काढला आणि दरवाजा बंद केला. त्यामुळे मालिकेत नवीन वळण दिसत आहे, त्यामुळे हे फॅन्सना कितपत आवडेल हे माहीत नाही. बबिताच्या हसर्यावर आपलं जीवन देणाऱ्या जेठलालला वेळेत मदत करता आली नाही. असे घडले की आपत्कालीन परिस्थितीत बबिता आणि अय्यर यांना काही टॅब्लेटस (गोळ्यांची) गरज होती. म्हणूनच बबिताने जेठालाल यांना ती गोळी घेऊन येण्याची विनंती केली. पण जेठालाल त्या गोळ्या बबिता जी पर्यंत वेळेवर पोहोचवू शकला नाही. त्यामुळे बबीता आणि जेठालाल यांच्यात याविषयी भांडण झाले.