ये रिश्ता क्या केहलाता है मालिका अभिनेता करण मेहरा याला नुकतीच अटक करण्यात आली आहे. करण मेहरा हा हिंदी मालिका अभिनेता असून काही चित्रपटासाठी त्याने राजकुमार हिराणी आणि रामगोपाल वर्मा यांच्याकडे असिस्टंटचे काम सांभाळले होते शिवाय मॉडेलिंगमध्येही त्याने अनेक मंचावर रॅम्पवॉक केले आहे. करण मेहराला अटक का करण्यात आली याचा नुकताच खुलासा झाला आहे.
करण आणि त्याची पत्नी अभिनेत्री निशा रावल यांचे १२ नोव्हेंबर २०१२ साली लग्न झाले होते. निशा ही हिंदी मालिका अभिनेत्री असून तिने मॉडेलिंगही केले आहे. नच बलीयेच्या शोमध्ये या दोघांनी एकत्रित पार्टीसिपेट केले होते. हसते हसते या मालिकेच्या सेटवर या दोघांची ओळख झाली होती सहा वर्षांच्या भेटीगाठीनंतर या दोघांनी २०१२ साली लग्न करण्याचा निर्णय घेतला. या दोघांना ४ वर्षांचा मुलगा आहे. परंतु इतक्या वर्षांचा त्यांच्या सुखी संसाराला गालबोट लागलेले पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून करण आणि निशा यांच्यात घरगुती वाद होत असल्याची चर्चा मीडियात रंगली होती. मात्र या गोष्टीवर निशाने मौन पाळले होते. परंतु ३१ मे रोजीच्या सोमवारी संध्याकाळी करणला पोलिसांनी अटक केली आहे. निशाने करणविरोधात घरगुती हिंसाचार प्रकरणी गोरेगाव येथील पोलिसठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली आहे. त्याच संध्याकाळी करणला अटक करण्यात आली असल्याचे सांगितले जाते.
करणने याबाबत नुकताच खुलासा केला आहे की मीडियाच्या माध्यमातून केवळ अफवा पसरवल्या जात आहे मुळात असे काही घडलेच नाही असा दावा त्याने केला आहे. हे सर्व खोटं असून गेल्या काही दिवसांपूर्वी मी पंजाबला शूटिंगसाठी गेलो होतो सेटवरील काही जणांना को’ रो’नाची लागण झाली होती. त्यामुळे शूटिंग बंद करण्यात आले त्यानंतर मी मुंबईला आपल्या घरी आलो इथे मी स्वतःचे चेकअप केले असून रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याने कोरोन्टाइन असून घरीच बसून आहे. आमच्यात कुठलीच भांडणं झाली नाहीत या बातम्या कुठून पसरवल्या जातात तेच कळत नाही आमच्यात सर्व काही आलबेल आहे असे म्हणून करणने विषयाला फाटा दिलेला पाहायला मिळतो आहे.