प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स प्रस्तुत ‘चंद्रमुखी’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट येत्या २९ एप्रिल २०२२ रोजी प्रदर्शीत होत आहे. लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित हा चित्रपट असणार आहे. झाडाझडती, पानिपत, महानायक यांसारख्या अनेक दर्जेदार कादंबऱ्यांचे लेखन विश्वास पाटील यांनी केलं आहे. प्रसाद ओकने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. गेल्या दोन वर्षांपासून चित्रपटातील कलाकारांबाबत गुप्तता बाळगून असलेल्या प्रसाद ओक यांनी नुकतेच एक मोशन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. ज्यात चित्रपटाचा नायक म्हणजे खासदार दौलत देशमाने यांची पुसटशी झलक दाखवण्यात आली आहे.

त्यामुळे चंद्रमुखीच्या राजकीय रशीली प्रेमकहाणीचा नायक कोण असणार? याची उत्कंठा वाढलेली पाहायला मिळत आहे. अर्थात चित्रपटाची नायिका म्हणजेच चंद्राची भूमिका कोण साकारणार हे देखील गुलदस्त्यात ठेवण्यात आले होते. गेल्या दोन वर्षांपूर्वी प्रसाद ओक यांनी आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली होती. चांद्रमुखीची भूमिका सोनाली कुलकर्णी साकारणार असे अंदाज त्यावेळी बांधण्यात आले होते मात्र ही भूमिका प्राजक्ता माळी साकारणार असल्याचे बोलले जात होते. त्यातच खा. दौलत देशमाने ही भूमिका अभिनेता आदिनाथ कोठारे निभावणार अशी चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. चंद्राच्या दौलतचा चेहरा नेमका कुणाचा आहे या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे कारण नूकताच चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

ज्यात जाणकार प्रेक्षकांनी ओळखलेला आदिनाथ कोठारे हाच मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे समोर आले आहे. खा दौलत देशमानेच्या भूमिकेतील आदिनाथ कोठारेचा लूक पेक्षकांसमोर नुकताच दाखल झाला आहे. मात्र अजूनही चित्रपटाची नायिका म्हणजेच चंद्राची भूमिका कोण साकारणार हे गुलदस्यातच ठेवलेले पाहायला मिळत आहे. आजपर्यंत अनेक नेते महाराष्ट्रानं देशाला दिले. मला सांगा त्यातले किती नेते महाराष्ट्रातल्या कलावंतांसाठी लढले पण, मी लढणार लोककलावंतांना त्यांचे हक्क मी मिळवून देणार. मातीतल्या कलेचा सन्मान करणार शब्द आहे माझा, असा दौलतचा चित्रपटातला एक डायलॉग देखील सोशल मीडियावर व्हायरल होत होता. हा आवाज देखील आदिनाथ कोठारेच्या आवाजाशी मिळता जुळता असल्याचे दिसून आले होते.
त्यामुळे दौलत देशमानेच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे असणार हाच अंदाज प्रेक्षकांकडून बांधला जात होता. या चित्रपटाच्या नायक आणि नायिकेबाबत उत्कंठा वाढली असल्याने या चित्रपटाची प्रदर्शना अगोदरच जोरदार चर्चा रंगत आहे. त्यात चित्रपटाच्या प्रोमोवरून हा पडदा नुकताच हटवण्यात आलेला पाहायला मिळतो आहे. खासदार दौलत देशमानेच्या भूमिकेत आदिनाथ दिसत असून चंद्राची भूमिका अभिनेत्री मृण्मयी निभावणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या चित्रपटातून आणखी एकदा मृण्मयी आणि आदिनाथ एकत्रित स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. साटं लोटं सगळं खोटं या चित्रपटातून हे दोघेही एकत्रित पाहायला मिळाले होते. या दोघांची जुळून आलेली केमिस्ट्री पुन्हा एकदा पाहायला मिळणार असल्याने चित्रपटाची उत्कंठा अधिक वाढली आहे.