Breaking News
Home / मराठी तडका / मायराच्या घरी दाखल झाली नवीन गाडी.. गाडीचा नंबर आहे खूपच खास
myra vaikul new car
myra vaikul new car

मायराच्या घरी दाखल झाली नवीन गाडी.. गाडीचा नंबर आहे खूपच खास

माझी तुझी रेशिमगाठ या लोकप्रिय मालिकेत आता नेहा आणि यशच्या प्रेमाचे रंग खुलू लागले आहेत. विशेष म्हणजे मालिकेत आता होळीचा एक स्पेशल भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नुकतेच मालिकेत नेहाच्या घरी होळी खेळल्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. यावेळी नेहाच्या घरी यश आणि समीरने देखील उपस्थिती लावलेली पाहायला मिळणार आहे. नेहा आणि परी या मायलेकीच्या नात्यात परीला दुसऱ्या कोणाचीच मध्यस्ती नकोय. त्यामुळे यशला ती बाबा म्हणून स्वीकारण्यास लवकर तयार होणार नाही, हे मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यासाठी परीच्या मनात आपलं घर करू पाहणाऱ्या यशसाठी हे मोठं आव्हानच असणार आहे. एकीकडे परीची समजूत घालण्याची तयारी मालिकेत जोरदार सुरू आहे.

myra vaikul new car
myra vaikul new car

तर परी म्हणजेच मायराच्या घरी आनंदाचे क्षण दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. कारण मायराच्या कुटुंबात आता आणखी एक नवी कोरी गाडी दाखल झालेली पाहायला मिळत आहे. हे आनंदाचे क्षण मायराचे आई बाबा गौरव वायकुळ आणि श्वेता वायकुळ यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. गो ग्रीन असे म्हणत टाटा नेक्साॅन या ब्रँडची इलेक्ट्रिक गाडी घेऊन त्यांनी हा आनंदाचा क्षण चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या गाडीची किंमत साधारण १५ ते १७ लाखांच्या घरात जाते. या गाडीचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे तिचा नंबर १ जून १९६० हा मायराच्या आजोबांचा जन्मदिवस. काही दिवसांपूर्वीच मायराच्या आजोबांचे निधन झाले होते. त्यावेळी मायराच्या आईची भावुक करणारी इंस्टाग्राम वरील पोस्ट चर्चेत आली होती.

myra new car new song aai
myra new car new song aai

त्यामुळे १६६० हा गाडीचा नंबर आमच्या आयुष्यात खूप खास आहे. वडिलांच्या आठवणीत हा नंबर नेहमी आम्हाला खूप कष्ट करण्याचा उत्साह देईल असे मायराच्या आईने म्हटले आहे. नुकतेच मायराचे एक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. आई विना मला करमत नाही या गाण्यात मायरा वायकुळ आणि अंकिता राऊत या दोघी माय लेकीच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. कोलिवूड प्रस्तुत आई हे गाणं दिया वाडकर आणि स्नेहा महाडिक या गायिकेंनी गायलं आहे. युट्युबवर अवघ्या तीन दिवसातच हे गाणं हिट ठरलं असून ४ लाखांहून अधिक प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला आहे. मालिका, अल्बम माध्यमातून मायरा हळूहळू स्वतःची ओळख निर्माण करताना दिसत आहे. या यशस्वी प्रवासासाठी मायराला खूप खूप शुभेच्छा.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.